दिल्ली निवडणूक 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्लीकरांना आवाहन; रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान करा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीवर पुढील पाच वर्ष कोण राज्य करणार, दिल्लीचे भविष्य काय असेल याबाबतचा निर्णय नोंदवण्यास राजधानीच्या मतदारांनी आज (शनिवार) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 साठी मतदानास प्रारंभ झाला आहे. दिल्लीचे सुमारे 1.47 कोटी मतदार आज आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि कॉंग्रेस (कॉंग्रेस) मधील … Read more

मूळ मुद्यांवरून देशाचे लक्ष भरकटवणे ही मोदींची शैली-राहुल गांधी

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन करताना काँग्रेससह विरोधकांवर विविध मुद्यावरून टीका केली. यावेळी मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्षरीत्या टोमणा मारत त्यांना लक्ष केलं. मोदींनी लोकसभेतील केलेल्या भाषणावर राहुल गांधी यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान निवासस्थानाचा पत्ता बदलणार; संसदेत पोहचण्यासाठी घरापासूनच बांधण्यात येणार नवीन भुयारी मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान निवास आणि संसद भवन यांना जोडण्यासाठी नवीन भुयारी मार्ग काढण्याचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत पंतप्रधान निवास साऊथ ब्लॉकला हलवण्यात येणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचे संचालक विमल पटेल यांनी सांगितलं आहे. सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून हे काम … Read more

अयोध्यात भव्य राम मंदिरासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ स्थापना करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला आहे. त्यानुसार राम मंदिर निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मोदींनी … Read more

सीएए विरोधात शाहीनबागमध्ये सुरु असलेलं आंदोलनं योगायोग नाही, एक कारस्थान आहे- पंतप्रधान मोदी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे. विकासाच्या मुद्द्यांवरून दिल्लीत सुरु झालेला प्रचार आता सीएएविरोधात आंदोलनांना केंद्रस्थानी ठेवत आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकला आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सामील झाले आहेत. सीएएच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत दिल्लीतील कडकडडुमा येथील प्रचारसभेत त्यांनी मोठं विधान केलं आहे.

बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच

जिल्ह्यातील एका युवकाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशातील बेरोजगारांचीही राष्ट्रीय नोंदणी व्हायला हवी, त्यांच्या रोजगरावरही गांभीर्याने विचार व्हायला हवा यासाठी आवाहन केलं आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही नोंदणी व्हावी अशी इच्छा अमीर इनामदार यांनी आपल्या आवाहनातून व्यक्त केली आहे

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ठप्प पडलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने या घोषणेकडे पहिले जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

”परीक्षा पे चर्चा २०२०LIVE”: पंतप्रधान मोदींचा विद्यार्थांशी संवाद

परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहेत. सलग तिसऱ्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत.

‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं.