पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली होणार; भाजप नेत्याचे संकेत

मुंबई । विधानसभा निवडणूकाकानानंतर मोठया सत्तानाट्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवड्यात एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात होत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली होतील, असे विधान … Read more

मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करा! दरेकरांचा नितीन राऊतांना खोचक सल्ला

उस्मानाबाद । भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला … Read more

अर्णव गोस्वामीच्या अटकेची उद्धव ठाकरेंना किंमत मोजावी लागेल- प्रवीण दरेकर

अलिबाग  । उद्धव ठाकरे सरकारने अर्णव गोस्वामी यांना अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आम्ही ठाकरे सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. यापूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल … Read more

मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत म्हणून राज्यपालांना भेटावं लागत; भाजपचा पलटवार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भाजपनं पलटवार केला आहे. ‘मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी कामं केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही,’ असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना … Read more

प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे पाटलांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? ; खडसेंच चंद्रकांत पाटलांना चोख प्रत्युत्तर

chandrakant dada khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी हाती घड्याळ बांधल्यानंतर आता एकनाथ खडसे विरुद्ध भाजप असा वाद रंगल्याचं पाहायला मिळतं. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. मला थांबवण्यासाठी कोणी का आग्रह केला नाही? एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

रडणारे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार ?? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी संकटात असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकार हे  रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू … Read more

कोरोना योद्ध्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरी द्या, प्रविण दरेकरांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळात लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोरोना योध्दांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. तसेच मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांना शहिदांचा दर्जा … Read more

‘सरकारला फडणवीस संताजी-धनाजीसारखे दिसतात’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात … Read more

अयोध्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंना पवारांची NOC लागू नये हीचं अपेक्षा; प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई । राम मंदिराबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) लागणार नाही अशी अपेक्षा आहे,’ असा खोचक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हाणला आहे. ‘पहले मंदिर फिर सरकार अशी … Read more