मंत्री शंभूराज देसाईंनी पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेत मागितले आशीर्वाद

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतलेले पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई प्रथमच कराड शहरात आले होते. यावेळी शंभुराजें देसाई यांनी कराडच्या प्रितीसंगमावरील स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करत पृथ्वीराज चव्हाणांची त्यांनी भेट घेतली.

या चर्चेमागे दडलंय काय? शरद पवार,पृथ्वीराज चव्हाण यांच्यात व्यासपीठावरच चर्चा

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सत्तास्थापनेसाठी मुदत अगदी जवळ आली असताना शिवसेना आणि भाजपा मधील युतीचा प्रश्न काही निकाली लागण्याची शक्यता दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर ठाम असून त्यामुळे सत्ता स्थापनेची शक्यता धूसर बनत चालली आहे. दोन्ही पक्ष सरकार स्थापन होईल असे म्हणत असले तरी त्याचा … Read more

गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणले?पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता आज कराड शहरात झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित होते.

मोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. मात्र आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोदी, शहा यांच्या प्रचार सभांचा चागला परिणाम होत असल्याचं म्हणालेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि अमित शहा जितक्या सभा घेतील … Read more

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

भाजप भावनिक मुद्दे काढेल, आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यावर निवडणुक लढणार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप भावनिक मुद्दे काढेल पण आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यांवर निवडणुक लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कराड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा … Read more

कराड दक्षिण मधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांची उमेदवारी जाहीर

कराड प्रतिनधी | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदार संघातून काँग्रेस कडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या लोकसभा लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसची ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर#hellomaharashtra@INCMumbai @INCIndia @prithvrj pic.twitter.com/akCa9HraS0 — Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 1, 2019 काँग्रेस पक्षाने ५१ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली होती … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला विधानसभेचा अर्ज, लोकसभा की विधानसभा दोन दिवसांत ठरवणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने विधानसभांसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही जाहीर झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोणाला निवडणुक रिंगणात उतरवायचे यावर मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जात होतं. चव्हाण यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावाही त्यानिमित्त आयोजित केला होता. … Read more

पृथ्वीराज चव्हाणांना सोडून गेलेले सूर्याजी पिसाळ, शिवराज मोरेंचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवाजी महाराजाच्या काळात एक पिसाळ झाला, मात्र आज लोकशाहीच्या काळात कराड दक्षिमध्ये एक सुर्याजी पिसाळ झाला, अरे गेला तर गेला मात्र येथे आमच्याकडे मावळे आहेत, असा टोला नाव न घेता आ. आनंदराव पाटील यांना शिवराज मोरे यांनी मारला. आ. आनंदराव पाटील यांच्यावर कॉग्रेसच्या कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी अत्यंत … Read more

काँग्रेसची मोठी खेळी; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश … Read more