भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या … Read more

कोल्हापूरात अवकाळी पावसाने ऊसतोड कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त; रात्र पावसात भिजत काढली

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूमुळे सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनचा सर्वधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटांचा सामना हे ऊसतोड मजूर करत आहेत. रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे शिरोळ मधील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगारांच्या 100 हून अधिक झोपड्या उध्वस्त झाल्या … Read more

पुन्हा अस्मानी संकट! अमरावती जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस; रब्बीचं पीक सुद्धा गेलं?

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराज्यावर कोपला आहे. त्यातच रविवारी ४ वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडच पाणी पळालं आहे. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीवर असलेल हरभरा, … Read more

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका; गहू, ज्वारीसोबत फळबागांचे लाखोंचे नुकसान

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून रविवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने रब्बी पिकांसह व फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शनिवार दि. १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील हवामानामध्ये अचानक बदल होत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यातच रविवारी दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ राहिल्यानंतर सायंकाळच्या वेळी काळेकुट्ट ढग जमा होत संध्याकाळी ७ वाजेनंतर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी … Read more

परतीच्या पावसानं राज्याला झोडपलं; उद्याच्या मतमोजणीवरही परिणाम होण्याची शक्यता

राज्याला सध्या परतीच्या पावसानं झोडपलं असून उद्या होणाऱ्या मतमोजणीवरही पावसाचं सावट आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरू असल्यानं शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून २८ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महापूर २०१९ – संकटे दाही दिशा, जडली झुंजायाची नशा

विशेष लेख | मानसी निर्मळे, कृष्णात स्वाती कोल्हापुरात २०१९ साली आलेल्या महाभयंकर पुरानंतर विविध सामजिक घटकांनी एकत्र येऊन मदतकार्य राबविले. त्याच प्रयत्नांची एक कहाणी..!! २०१९ चा पावसाळा हा सर्वार्थाने लक्षात राहील तो म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आलेला महापूर आणि या महापुराने घडवलेली वाताहत यांसाठी. केवळ चार – दोन दिवस नाही; तर तब्बल दहा दिवस … Read more

नाशिक जिल्ह्यात मुसळदार पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

नाशिक प्रतिनिधी | नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पावसान उघड दिली होती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना चांदवड, दिंडोरी, कळवण, निफाड व नाशिक तालुक्यात पावसान दमदार हजेरी लावली. पण पावसाचा जोर इतका होता की यामुळं द्राक्षबागांचे मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाची वाट पाहत असताना दुपारनंतर दमदार पावसाला सुरवात झाली. चांदवड … Read more

पावसामुळे महाराष्ट्र- मध्यप्रदेशची वाहतूक ठप्प

अमरावती प्रतिनिधी| वेधशाळेन वर्तविलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालीये. अमरावती जिल्यातील धारणी तालुक्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. गडगा, सिपना, खापरा, खंडू आणि दुणी गावाजवळील अलाई नाला ओसंडून वाहतोय. सुरू असलेल्या संततधार पावसामुळ या मार्गावरील नदी-नाल्यांना पूर आला आहे. वाहतूक … Read more

पैठण तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी

औरंगाबाद प्रतिनिधी | दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यामध्ये अखेर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमाने उड्डाण घेतं दिसत आहेत. रविवारी देखील औरंगाबाद विमानतळावरून ‘क्लाउड सिडिंग’ करण्यासाठी विमाने उड्डाण घेतले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. विमानाच्या साहाय्याने ढगात ‘क्लाउड सिडींग’ करण्यात आले. या नंतर काही तासाने पैठण तालुक्यातील गोपवाडी भागात दमदार पाऊस झाला. या … Read more