‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचं ऑनलाइन उद्घाटनदेखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याची खात्री पटल्यानेच या निर्णयाची अमंलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.