सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे देश बुडायला नको ! रोहित पवारांची ट्विटरद्वारे केंद्रावर टीका

शहरातील एका कार्यक्रमामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शहांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याविषयी आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल बजाज यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे असे ते म्हणाले. तसेच सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको अशी भितीही त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

म्हणुन रोहित पवार आणि विश्वजीत कदमांची गाडी खेळण्यांच्या दुकानासमोर थांबली

गेले दोन महिने राज्यातील राजकीय नेते मंडळी आधी निवडणूक आणि नंतर प्रदीर्घ काळ चाललेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यात अडकून पडली होती. निवडणुकांचा प्रचार, निवडणूक निकाल इतकेच नाहीतर सत्तास्थापनेच्या तिढ्यात आमदार फुटू नाही म्हणून पक्षाकडून झालेली हॉटेल कोंडी यासर्वात या आमदार राजकारणी मंडळींची दमछाक झाली. दरम्यान याकाळात पक्षकुटूंबाकडे लक्ष देता-देता आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे यासर्वांचं दुर्लक्ष झालं आमदार,मंत्री म्हटलं कि खासगी आयुष्याला बहुतेक वेळा मुरुड घालावीच लागते ही एक कटू बाजू राजकारणाची आहे. आपल्या पोराबाळांचा स्नेह, त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा भाग कमीच नशिबी त्याचा येतो.

खचून जाणं साहेबांच्या डिक्शनरीतच नाही, सरकार महाविकास आघाडीचंच येणार – रोहित पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र अजित पवारांसोबत गेलेल्या ९ आमदारांपैकी अनेकांनी युटर्न घेत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सरकारला बहुमत सिद्ध करणे आता अवघड जाणार असल्याचे बोलले जातेय. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत खचून जाणं शरद … Read more

नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले. With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W — … Read more

ठरलं! मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा? पण..

विशेष प्रतिनिधी | सत्तास्थापनेवरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असताना भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती बिघाड झाल्याने आता शिवसेना आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर येत आहे. महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत … Read more

कर्जत-जामखेडमध्ये घडले ‘महाराष्ट्र धर्मा’चे दर्शन; राम शिंदेंनी बांधला रोहित पवारांना फेटा !

विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आपले स्था कायम राखले. दरम्यान यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित … Read more

कर्जत-जामखेडमधून रोहित पवार ‘सुसाट’; राम शिंदे पिछाडीवर

शाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे राम शिंदे यांना रोहित कडवी लढत देत आहे

आम्हाला लै कॉन्फिडन्स हाय,निवडून येनार तर रोहित दादाच! कार्यकर्ते जोमात

विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात दुरंगी लढत झाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तसाचा अवधी राहिलेला असताचा कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आले असल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी आधीच लावले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी डिजेसाठी ऍडव्हान्स दिला असुन काहींनी थेट सट्टा लावला आहे.

कर्जत-जामखेडमध्ये निकालाआधीच रोहित पवार जनतेच्या ‘फोटोतील’ आमदार

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेली लढत महाराष्ट्रातील सर्वात जास्त चुरशीची लढत मानली गेली. या मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार अशी दुरंगी लढत पहायला मिळाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,’ रोहित पवारांनी भाजपची झोप उडवली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना तीन तीन वेळा या मतदार संघात यावं लागतं. तसेच मतमोजणी नंतर सर्व पत्रकार ” कर्जत जामखेड मध्ये भाजपचा राम शिल्लक राहिला नाही” अशी बातमी करणार असल्याचे म्हणत, राम शिंदेंना जोरदार टोला लगावला.