अयोध्येत बुद्धविहाराची उभारणी करा!- रामदास आठवलेंची मागणी

पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार … Read more

महाविकास आघाडीच्या सत्तेत दलितांवरील अत्याचारात वाढ- रामदास आठवले

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले … Read more

रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर … Read more

भाजपाने आपल्या कोट्यातील एक जागा आरपीआयला द्यावी – रामदास आठवले

मुंबई ।  येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या ४ जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावी अशी मागणी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक … Read more

मोहिते पाटलांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची जबर खेळी

माळशिरस प्रतिनिधी |  राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराला शरद पवार नेमके काय उत्तर देणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. अशातच कधी काळी मोहिते पाटलांचे कट्टर वैरी असणारे उत्तरराव जानकर यांना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे. उत्तमराव जानकर यांनी २००९ … Read more

संभाजी भिडेंच्या प्रतिमेला शेणाचा प्रसाद ; बुद्धांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आरपीआय आक्रमक

भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भिडे गुरुजींच्या प्रतिमेला शेण लावून आंदोलन करण्यात आलं.

भारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर

जालना प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मोदींना लोकप्रियतेची चटक आहे. अमेरिकेसारखे देश याचा फायदा घेऊन त्यांचा व्यापार आपल्या देशात वाढवत आहेत. यासर्वाचा फटका इथल्या शेतकर्‍यांना बसणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=SjcKU-JeGQ8&w=560&h=315]

 

रामदास आठवलेंच्या पत्नीला लढवायची आहे आर आर पाटलांच्या पत्नीच्या विरोधात निवडणूक

तासगाव प्रतिनिधी |  विधानसभा निवडणूक जशी जवळ येवू लागली आहे.तसे इच्छुकांचे बाणभात्यातून बाहेर हेवून विरोधकांवर सुटू लागले आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी आर आर पाटलांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आपल्याला या मतदारसंघाची आमदार केल्यास आपण येथील विकासासाठी केंद्रातून निधी खेचून आणू असे … Read more

राजू शेट्टींचा आघाडीपेक्षा वेगळा विचार ; विधानसभेचे ‘मिशन ४९’

कोल्हापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत स्वीकारलेले राजू शेट्टी आपला पक्ष अखंडित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४९’ आखले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचं कि नाही याच निर्णय देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत. १० वर्ष लोकसभेचा खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांना धैर्यशील माने या … Read more

राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्री पदे

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित आसा राज्य मंत्री मंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे या नेत्यांचा मंत्री मंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच राजभवनाच्या गार्डनवर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून … Read more