प्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्वच्छता निरीक्षक जखमी

सांगली | भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर वारंवार हल्ले होण्याचे प्रकार घडत असताना शनिवारी सकाळी वान्लेसवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सांगली व मिरज शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुले, … Read more

केंद्र सरकारने खतांच्या किमतींत वाढ केल्याने, राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करणार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

Jayant Patil

सांगली | देशात निवडणूका संपल्यानंतर महागाईचा बोझा सामान्य नागरिकांवर केंद्र सरकार लादत आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना आता खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. प्रचंड प्रमाणात खतांच्या किमती वाढविण्याचा पापं भाजपने केलेले आहे. याचा निषेध म्हणून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर बोझा लादणाऱ्या भाजपचा निषेध करण्यासाठी आंदोलन हातात घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हि दरवाढ … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या घरात, नवे १ हजार ६०१ रुग्ण तर तब्बल ४९ जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील चार दिवस रुग्णसंख्या स्थिरावल्यानंतर शनिवारी पुन्हा रुग्णांत वाढ झाली. चोवीस तासात 1 हजार 601 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आत्तापर्यंतची कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या घरात पोहोचली. दिवसभरात तब्बल 49 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1573 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 144 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 127, कडेगाव 136, खानापूर … Read more

दुर्देवी ः ईद दिवशी गरम शिरखुर्म्यात पडून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू

सांगली | मिरज येथील ईदगाहनगर येथे गरम शिरखुर्म्यात पडल्याने अरहान मोहसीन मणेर या दीड वर्षाच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ईद दिवशीच घडलेल्या घटनेबाबत इदगाहनगर परिसरात हळहळ व्यक्त होत होती. शुक्रवारी सकाळी ईदची तयारी सुरू असताना मोहसीन मणेर यांच्या घरात ही दुर्घटना घडली. सकाळी दहा वाजता घरात मोठ्या पातेल्यात शिरखुर्मा बनवून ठेवला होता. घरात कॉटखाली … Read more

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद : १०१ जणांचे रक्तदान

सांगली | श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या मिरज विभागातर्फे पारंपरिक शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात १०१ रक्तदात्यानी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने मिरज येथे शिवजयंतीचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, भाजप नगरसेवक निरंजन आवटी … Read more

सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिर, कोरोनामुक्त वाढले, नवे १ हजार २९२ पाॅझिटीव्ह

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असून शुक्रवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त वाढले. त्यामुळे आणखी दिलासा मिळाला. चोवीस तासात 1 हजार 292 रुग्ण आढळून आले. तर 1577 जणांनी कोरोनावर मात केली. याशिवाय 43 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 169 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 82, कडेगाव 77, खानापूर 151, पलूस … Read more

दोन महिन्यात तीसरी घटना : बेडगमध्ये जैव वैद्यकीय कचरा व पी.पी.ई. किट उघड्यावर

सांगली | मिरज तालुक्यातील बेडग येथे जैव वैद्यकीय कचरा व पीपीई किट बेडग-नरवाड रस्त्यालगत उघड्यावर टाकले आहे. बेडग स्मशानभूमी रोड लगत ओढ्याजवळ काही अंतरावर वापरलेले पीपीई किट उघड्यावर टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. तर स्मशानभूमी जवळच नरवाड रोडच्या बाजूस जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. या पासून रोगराई होण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यातील … Read more

सांगलीत व्यापाऱ्यांकडील भाजीपाला, आंबासाठा जप्त

सांगली | सांगलीत बंदी असतानाही लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करीत मध्यरात्री पासून पहाटे अवैधरित्या भरलेल्या होलसेल भाजी आणि आंबे विक्रीवर बाजारावर सांगली महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आंब्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपा उपायुक्त राहुल रोकडे आणि पोलीस निरिक्षक … Read more

गांजा पिकवायला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागावी

Khot & Sharad Pawar

सांगली | राज्यातील देशी दारू, बिअरबार चालकाच्या नुकसानीची शरद पवार यांना काळजी लागली आहे. त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत, मात्र या जाणत्या राजाने शेतकऱ्यांच्या अश्रूकडे, कष्टकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष देण्याची गरज होती. शेती उद्ध्वस्त झाली आहे, शेतमाल कुजून जातो आहे. अशावेळी शेतक-यांना या संकाटातून बाहेर काढण्यासाठी या खरीप हंगामात त्यांना गाजा पिकवायला परवानगी द्यावी. शरद … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २६६ रुग्ण व्हेंटीलेटरवर, नवे १ हजार ३५४ पाॅझिटीव्ह तर ४५ मृत्यू

Sanagli Corona

सांगली | सांगली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असली तरी तब्बल 266 रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्याचे स्पष्ट झाले. तर 2 हजार 241 जण ऑक्सिजनवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चोवीस तासात 1 हजार 354 रुग्ण आढळून आले. मात्र मृत्यूंचे प्रमाण वाढले असून दिवसभरात 45 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 306 जणांनी कोरोनावर मात केली. … Read more