रयत क्रांतीचे दूध दरासाठी सरकार विरोधात गुरुवारी चाबूक फोड आंदोलन : सदाभाऊ खोत

Sadhbhau Khot

सांगली | पशुधनाचा उत्पादन खर्च वाढत असताना दुधाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारकडून दूध दरवाढीसाठी धोरण राबविले जात नाही, तर महानंदा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. दुग्ध व पशुसंवर्धन खाते बंद करुन दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्य सरकारविरोधात संपूर्ण राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले … Read more

… म्हणून 108 वर्षांच्या जरीना आजींचा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून साडी चोळी देऊन सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेतील रुग्नांची संख्या कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे शस्त्र मानले जात आहे. लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र इस्लामपूर येथील एका 108 वर्षीय आजींनी लसींचे … Read more

दुर्घटना : मासेमारीसाठी गेलेली तीन भांवडे लुशीसह बुडाली, दोन भावडं अद्याप बेपत्ता

Drowned

सांगली | आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील एकाच कुटुंबातील दोन सख्खे, एक चुलत भाऊ आणि त्यांचा कुत्राही कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची रविवारी दि. 6 जूनला घटना घडली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या भांवडापैकी एकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला असून कुत्रा लुशीचाही मृत्यू झाला आहे. परंतु यांच्या मृत्यू कसा झाला, यांचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. रात्री उशिरा … Read more

ढगफुटी अतिवृष्टी : शिराळा तालुक्यातील एमआयडीसीत कंपन्यांचे पत्रे उडाले, सहाजण जखमी

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील एमआयडीसी परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढग फुटीच्या पावसात अनेक कंपन्यांच्या इमारतीचे पत्र्यांचे शेड जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यांच्या पावसात सहाजण जखमी झालेल्या आहेत. नुतन महादेव डांगे (वय- 23 रा. शिराळा) युवतीचे पायवर भिंत पडल्याने दोन्ही पाय मोडले असून मेघा लक्ष्मण पाटील … Read more

सांगली जिल्ह्यात रूग्णवाढ : नवे 1 हजार 13 पाॅझिटीव्ह तर २७ जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना गुरुवारी पुन्हा हजारावर रुग्णसंख्या गेली. नवे रुग्ण 1 हजार 13 रुग्ण आढळले, आठ हजाराहून अधिक चाचण्या केल्याने रुग्णवाढ झाली. मात्र पॉझिटिव्हीटी दर 12.75 टक्के राहिला. तर 27 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1064 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 137 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 18, … Read more

सांगली जिल्ह्यात पुन्हा हजाराचा आकडा ओलांडला : नवे 1हजार 7 पाॅझिटीव्ह तर 26 जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असताना मंगळवारपासून चाचण्यांचे प्रमाणा वाढविण्यात आले. त्यामुळे पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली असून हजाराचा आकडा ओलांडला. चोवीस तासात नवे 1007 रुग्ण आढळले, तर 26 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1472 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 138 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 57, कडेगाव 60, खानापूर 57, पलूस 85, … Read more

सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याला दुबईतील कंपनीकडून 2 कोटी 80 लाखांचा गंडा

Fraud

सांगली | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ ट्रेडिंग एल. एल या कंपनीने येथील एका द्राक्ष व्यापाऱ्याला 2 कोटी 80 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पांडुरंग जगताप यांनी कंपनीविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगताप यांची द्राक्ष निर्यात करणारी ऑल एशिया इम्पोर्ट अँड … Read more

मिरजेत कोरोना रूग्णालयात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

सांगली | मिरज येथील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन कुंभार (वय- 35 सुभाषनगर, मिरज) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुमन कुंभार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मिरज येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेेले काही दिवस … Read more

सांगली जिल्ह्याची रुग्ण संख्या बाराशे पार : नवे 1 हजार 218 पाॅझिटीव्ह, तर 1 हजार 256 कोरोनामुक्त

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असतानाच शुक्रवारी जिल्ह्याची रुग्ण संख्या हि 1200 च्या जवळ पोहोचली. चोवीस तासात कोरोनाचे नवे 1 हजार 218 रुग्ण आढळून आले. तर 36 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 256 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 151 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 27, कडेगाव 127, खानापूर 81, … Read more

सांगली आणि सातारा जिल्ह्यात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, आठपैकी सहा जणांना अटक

सांगली | सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील आठपैकी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलिस … Read more