कापरी मध्ये मेंढ्याच्या कळपावर बिबट्याचा हल्ला

सांगली प्रतिनिधी । शिराळा तालुक्यातील कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २० कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ७ कोकरे जखमी झाली आहेत. याठिकाणी असणारी ४ कोकरे बिबट्याने लंपास केले आहेत. ही घटना सायंकाळच्या सुमारास कापरी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या पाझर तलाव जवळील श्रीकांत जयसिंग पाटील यांच्या शेतात घडली. रेड येथील मेंढपाळ सुभाष तांदळे यांची मेंढरे श्रीकांत पाटील … Read more

सांगली जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या महालसीकरण अभियानात 90 हजारांवर नागरिकांचे लसीकरण

सांगली प्रतिनिधी । ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी पहिला व दुसरा दोन्ही डोस गरजेचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महालसीकरण अभियानात 90 हजारावर नागरिकांनी लस घेतली. शुक्रवारीही महालसीकरण अभियान सुरु राहणार असून ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस कालावधी संपूणही अद्याप घेतला नाही त्यांनी तसेच ज्यांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस … Read more

सांगली बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांचे भिकमांगो आंदोलन

सांगली प्रतिनिधी ।  सांगलीत एसटी संपला एक महिना झाल्यानंतर आर्थिक अडचणीत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी भिकमांगो आंदोलन केले. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. संपाच्या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वेतनवाढीची मागणी मान्य झाल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली होती. अद्यापही काही … Read more

कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या ‘मंडलाधिकाऱ्या’ने ठोकली धूम, ‘एसीबी’ने पाठलाग करून केले जेरबंद.

सांगली प्रतिनिधी । तासगावचा मंडलाधिकारी गब्बर सिंग गारळे (वय ३७) याला आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाच स्वीकारल्यानंतर गारळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अक्षरशः पाठलाग करून पकडले. कुमठे येथील एका तक्रारदाराला केसमध्ये मदत करण्यासाठी गारळे यांनी ही लाच मागितली होती. … Read more

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड

सांगली प्रतिनिधी | मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी सोमवारी पार पडल्या. अध्यक्षपदी महा विकास आघाडीचे शिराळाचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्रीताई मदन पाटील यांची बिनविरोध निवड झाली पदाधिकार्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. विकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या संधीचा … Read more

स्कुल व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली ; 11 विद्यार्थी जखमी

सांगली | आष्टा येथे क्लेरमोंट स्कुल ची स्कुल व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळल्याने अकरा विद्यार्थी, ड्रायव्हर व सहाय्यक महिला जखमी झाली. सोमवार सकाळी साडे आठच्या सुमारास आष्टा मर्दवाडी रोडवर मिरजवेस कडून एक पिवळ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगाने पूल संरक्षक दगडाला थटून कॅनॉलमध्ये कोसळली. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी जखमी विद्यार्थ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नाल्यात उतरून अकरा … Read more

सांगली : जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू, मतदारांची पळवापळवी

सांगली | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होत आहे. चिन्ह वाटपानंतर निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी सुरुवात झाली. सोसायटी गटांतील निवडणूक चुरशीची होत असून मातब्बर नेते या गटातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. मर्यादित मतदार संख्येमुळे मतदारांची पळवापळवी अन् दर यामुळे सोसायटी गट सर्वाधिक चर्चेत आला … Read more

CRIME NEWS : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् नंतर बलात्कार करुन केलं प्रेग्नंट

सांगली | इन्स्टाग्राम अ‍ॅपद्वारे मैत्री संबंध वाढवून विवाहाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जयदीप जयपाल चौधरी यास अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी 2021 मध्ये मोबाईल इन्स्टाग्राम अ‍ॅपवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही चॅटिंग करत होते. जयदीपने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी … Read more

दारु पिऊन करत होता थेट मंदिरातच चोरी; नागरिकांनी घडवली अद्दल

सांगली | मिरजेतील मंगळवार पेठेतील शनि-मारूती मंदिरात मद्यधुंद अवस्थेत एक इसम मंदिरात जावून मंदिराची काच फोडून देवाजवळ असलेली पितळी पंचपाळ चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना नागरीकांनी त्याला पकडून चोप दिला. त्याच्याकडे इतर ठिकाणी चोरून आणलेले मंदिराचे पितळी कळस होते. मिरज शहर पोलिसांनी या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चोरट्यास ताब्यात घेतले आहे. तो इसम वेगवेगळी माहिती देत … Read more

खटावमध्ये लाळ खुरकत रोगाने 50 मेंढ्यांचा झाला मृत्यू

सांगली | मिरज तालुक्यातल्या बेडग येथील लाळ खुरकत रोगाने 40 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता खटाव येथे गेल्या आठ दिवसांत जवळपास 50 हुन अधिक मेंढी व त्यांच्या पिलांचे मृत्यू झाल्याने मेंढी पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांत खटाव परिसरातील पन्नासहून अधिक मेंढी व मेंढीचे पिले यांचा मृत्यू झाला असून … Read more