सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक एकतर्फी होणार; ‘हे’ उमेदवार बिनविरोध

सांगली | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेरच्या क्षणी फसल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत मंगळवारी निश्चित झाली. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेलचे 21 तर भाजपच्यावतीने शेतकरी विकास पॅनेलचे 16 उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीत आघाडीने मातब्बरांना उमेदवारी देत भाजपला आव्हान दिले, मात्र भाजपकडून कमकुवत उमेदवार देण्यात आले. त्यामुळे अवघ्या … Read more

‘या’ जिल्ह्यातील 58 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

सांगली | ऐन सणासुदीच्या काळात मागण्या मान्य करूनही संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास आता एसटी महामंडळाने सुरवात केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानंतर राज्यात सर्वत्र कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही अचानक संपावर गेलेल्या 58 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये आटपाडी आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी भाजपचे आमदार … Read more

म्हणुन त्यांनी भटक्या कुत्र्यांची पिल्ली आरोग्य विभागाला दिली भेट

सांगली |  महादेवनगर परिसरातील युवा शक्तीच्या युवकांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला भटक्या कुत्र्यांची भेट दिली. शहरातील व महादेवनगरातील भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्ताची अनेकदा मागणी करून दुर्लक्ष केल्याने आज युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरोग्य विभागाचे अनिकेत हेंद्रे यांना भटक्या कुत्र्यांची भेट दिली. इस्लामपूर शहर व उपनगरांमध्ये वाढता भटक्या जनावरांमुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांच्यावर हिंसक कुत्र्यांचे हल्ले यामुळे … Read more

थरारक घटना : पत्नीचा पाठलाग करून पतीने काढला काटा

सांगली प्रतिनिधी |  मूळ गावी राहण्यास जाण्याच्या कारणावरून झालेल्या पती – पत्नीच्या वादात पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी विटा येथील बर्वे मळ्यानजीक घडली. लिलावतीदेवी नरेश साह असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती नरेश रघुवीर यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहार राज्यातील नवादाखास येथील हे परप्रांतीय कुटुंब आहे. लिलावती … Read more

मिरज दंगल प्रकरणी मैनुद्दीन बागवानसह 106 जण निर्दोष

सांगली प्रतिनिधी  |  मिरजेत 2009 साली गणेशोत्सव काळात जातीय दंगली झाल्या होत्या. यामध्ये अनेकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये सरकारी कामात अडथळा, बेकायदे जमाव जमविणे, सरकारी मालमत्तेस नुकसान करणे आदि कलमांखाली अनेकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते.याच्या गुन्ह्यातील 106 जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.पोळ यांनी निर्दोष मुक्तता केली. यामध्ये बजरंग पाटील, विकास सुर्यवंशी, … Read more

भरधाव डंपरने रस्त्याकडेला उभ्या दुचाकीला दिली जबरदस्त धडक; महिलेचा जागीच मृत्यू

सांगली | बेडग येथे मिरज -बेडग रोडवरती जिल्हा परिषद शाळेच्या समोर भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने रोडच्या बाजूस उभ्या असणार्‍या दुचाकीस मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मुक्ताबाई नामदेव जाधव या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून गाडीच्या काचा फोडल्या. मुक्ताबाई जाधव या मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग … Read more

भाजप कार्यालयासमोर राणेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक; पोस्टरवर शाई फेकल्याच्या घटनेचा केला निषेध

सांगली | आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होल्डिंगवर सकाळी कार्यालय बंद असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. याच्या निषेधार्थ आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालया समोर सदर घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक घातला व संबंधित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबतची तक्रार … Read more

सांगलीतल्या शेरीनाल्याजवळ अजस्त्र मगरीचे दर्शन; पहा Video

सांगली | कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे पात्राबाहेर पडलेल्या मगरी आता पुन्हा पात्राकडे परतू लागले आहेत. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे नदीकडे परतणाऱ्या मगरींनी अनेकदा नागरिकांची वाट अडवली. आमणापूर ते सांगली दरम्यान नदीकाठावर मगरींचा वावर वाढला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सांगलीतील शेरीनाला परिसरात अजस्त्र मगरीचे दर्शन झाल्याने पोहायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील … Read more

मी महाविकास आघाडीचा घटक त्यांचा गुलाम नाही – राजू शेट्टी

सांगली | महापूर रोखण्यासाठी भिंती बांधा, बोगदा काढा परंतू आमच्या बुडाखाली आलेल्या पाण्याचं नियंत्रण करा. पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान दिल्याची बतावणी करू नका. ते पैसे कोणाच्या घरात गेले? गोरगरीबांची चेष्टा करताना लाज वाटत नाही का? सांगली व कोल्हापूर जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनी काल्पनिक कथा रचून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नये. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी शासन निर्णय बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. … Read more

कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटले

सांगली | मिरज तालुक्यातील तासगाव ते मिरज जाणार्‍या मार्गावर कवलापूर गावच्या हद्दीत कामावरून घरी निघालेल्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. एवढंच नाही तर तरुणाला एटीएम मध्ये नेऊन त्यातील 20 हजार रुपये देखील काढून घेतले. सदरचा लुटमारीचा प्रकार हा शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी रोहन पांडुरंग … Read more