राजू शेट्टींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उच्च शिक्षित तरुणीनं घेतला शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय

सांगली प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या पोरींनो शेतकरी नवरा नको! असं म्हणू नका. शेती तोट्याची आणि बेभरवशाची असली तरी सुध्दा हे आव्हान आपण स्वीकारु आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करूया. या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेट्टी यांच्या आवाहनाला वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथील उच्यशिक्षित शिवलीला शिवाजी सुर्यवंशी या तरुणीने प्रतिसाद देत शेतकरी तरुणाशी … Read more

‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

दिल्ली येथे एका तरूणाने जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबाराच्या घटनेवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ”सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहे. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतआपली भूमिका मांडत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री  जयंत पाटील यांनी केली.

सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील २१ वर्षीय किरण उर्फ केराप्पा ढेमरे या तरुणास जत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने पोक्सो, बलात्कार, अट्रासिटीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. गुडडापूर येथील केराप्पा ढेमरे याची फेसबुकवरून शेगाव येथील अल्पवयीन मुलीची ओळख झाली.

मिरजेत डोक्यात दगड घालून इसमाचा खून;आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर

मिरज येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनोळखी इसमाच्या डोक्यात राजू जाधव याने दगड घालून खून केला. घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या खुनातील आरोपी राजू जाधव हा स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार कर्मचारी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.

सांगली जिल्ह्यात घरफोड्या वाढल्याची पोलीस महानिरिक्षकांची कबुली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यामध्ये घरफोड्यांच्या संख्येमध्ये वाढ निदर्शनास आली आहे. त्याच बरोबर काही पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डमध्ये देखील त्रुटी आढळून आल्याची कबुली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सांगली महापालिकेच्या सभेत नगरसेवकांचा गोंधळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड येथील वादग्रस्त जागा हस्तांतर करण्याच्या विषयाचे इतिवृत्त पूर्ण केले नसल्याने आजच्या महासभेत जोरदार गदारोळ झाला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी इतिवृत्त पूर्ण होईपर्यंत सभा तहकूब ठेवावी, अशी मागणी केली व ते महापौरांच्या पिठासनाकडे धावले , मात्र सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर अजेंड्यावरील विषय मंजूर करत वीस मिनिटात सभा गुंडाळली. महापौरांनी पळ … Read more

अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहे

सांगली जिल्ह्यातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळली आहे,यामुळे या ‘नेत्यांनी’ संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहेत असा आरोप भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचा खुलासा

कर्नाटकचे पाणी जतला मिळाले पाहिजे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. ते शक्य वाटत नाही. दोन्ही राज्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे याबाबतीत मौन आहे. त्यामुळे भाजपचे हे खोटे आश्वासन ठरणार असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्रकार बैठकीत केला. तर अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचे त्यांनी सांगितले.