मराठी बिग बॉस विजेता विशाल निकमचे देविखिंडीत जल्लोषात स्वागत

सांगली । बहुचर्चित ठरलेल्या बॉस मराठीला अखेर तिसर्‍या पर्वाचा विजेता मिळाला आहे. विशाल निकम ’बिग बॉस मराठी’च्या तिसर्‍या पर्वाचा विजेता ठरला आहे. कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्‍या खानापूर तालुक्यातील देविखिंडी गावची ओळख विशाल निकमच्या या यशामुळे आता सातासमुद्रापार गेले आहे. विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 चा विजेता ठरल्याचे जाहीर होताच त्याच्या चाहत्यांनी … Read more

इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करण्यासाठीच्या सभेला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दांडी; शिवसेना आक्रमक

NCP Shivsena

सांगली ।  इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण करण्याबरोबरच अन्य तीस विषयांच्या मंजुरीसाठी आयोजित सर्वसाधारण सभाही गणपूर्तीअभावी रद्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी पुन्हा एकदा सभेला दांडी मारली. विकास आघाडीच्या अध्यक्षांसह चौघा नगरसेवकांनी धक्कादायकरीत्या सभेकडे पाठ फिरवली. ईश्वरपूर नामकरणसाठी आग्रही असणार्‍या शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संतापजनक प्रतिक्रिया तर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. … Read more

महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची उडाली तारांबळ; रस्ता ओलांडून उसाच्या शेतात गेला अन्…

सांगली | सांगलीवाडीतील बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले. कदमवाडीच्या दिशेने आलेला गवा कदमवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडून नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात गेल्याने एकच खळबळ उडाली. महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची तारांबळ उडाली. शनिवार रात्री उशिरापर्यंत वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन दलाकडून गव्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होता. सांगलीवाडीतून कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री सव्वानऊ … Read more

स्मशानात अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे चक्क कुत्र्यांनी तोडले लचके; संतापजनक घटना

सांगली | खनभाग येथे राहणार्‍या मयत इंदू जाधव यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेहाचे मनपा कर्मचार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुत्र्यांनी लचके तोडून त्याचे तुकडे पळवले. या प्रकारामुळे जनमत संतप्त झाले असून यानिमित्ताने महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. असले प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा येथून पुढे मनपा मुख्यालयसमोर अंत्यसंस्कार … Read more

‘त्या’ तिहेरी आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम, मुलीच्या कुटुंबाकडे सापडली चिठ्ठी

सांगली । तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम आहे. सदरची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा आहे. मात्र, मयत शिवानी चंद्रकांत घाडगे या हातीद येथील मुलीच्या घरी … Read more

सांगली महापालिका पोट निवडणूक आचारसंहितेवरुन संभ्रम, पदाधिकारी आणि प्रशासनापुढे पेच

सांगली । महापालिकेच्या प्रभाग क्र.16 च्या पोटनिवडणूकीच्या निवडणूक आचारसंहितेवरुन निवडणूक आयोगाने संभ्रम वाढवणारे आदेश काढल्याने स्थायी सभा, महासभा होणार का? याबाबत पदाधिकारी ,प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने, स्थायी सभापती यांनी शासनाचे मार्गदर्शन मागवले आहे, तर नगरसचिवांनी विधी विभागाचा अहवाल मागवण्याची शक्यता आहे. एका पोटनिवडणूकीमुळे तब्बल 15-20 कोटीची विकास कामे थांबण्याची शक्यता आहे. राज्य … Read more

‘या’ वेश्यावस्तीमध्ये वारांगना महिलांसाठी झाला खेळ पैठणीचा कार्यक्रम

सांगली | सांगलीतल्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये वारांगना महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. गायन क्षेत्रातील अग्रेसर आरडीएक्स ग्रुपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत सुंदरनगर मधील महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये प्रारंभी महापालिकेचे अग्निशमन विभागाकडून चीफ फायर ऑफिसर विजय पवार आणि टीमकडून … Read more

‘दिव्यांगांना स्मार्ट प्रमाणपत्र देण्यासाठी लवकरच विशेष कॅम्प घेण्यात येणार’ – आयुक्त नितीन कापडणीस

सांगली । शासनाच्या आदेशानुसार मनपा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचा सर्व्हे करून संगणकीय प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी देणेबाबत विशेष कॅम्प घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. या संदर्भात शनिवारी त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शासनाने दिलेल्या आदेशानुसार 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 … Read more

द्राक्ष बागायतदारांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेकडून जोरदार निदर्शने

सांगली । जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना सर्वाधिग फटका बसला. हातातोंडाला आलेल्या बागा उध्वस्त झाल्याने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या बागायतदारांना तातडीने मदत देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खराब झालेल्या द्राक्षासह निदर्शने करण्यात आली. नियमित कर्जदार शेतकर्‍यांना जाहीर केलेली 50 हजार तात्काळ देण्याची मागणीही करण्यात आली. … Read more

दोन कारच्या भीषण अपघातात तरुण शास्त्रज्ञासह पत्नी जागीच ठार; गाड्यांचा झाला चक्काचुर

सांगली | विट्याहुन पुसेसावळीकडे जाणाऱ्या व तिकडून विट्याकडे येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघेजण ठार झाले. या अपघातात तरुण शास्त्रज्ञासह IT कंपनीत काम करणार्‍या पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कपिल माणिक झांबरे व त्यांची पत्नी धनश्री कपिल झांबरे (रा. डोंगरसोनी, ता. तासगाव) व सुदर्शन गजानन निकम … Read more