संजय राऊतांकडून स्वबळाचा नारा!! ठाकरे गटाच्या मनात नेमकं काय?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही भाजप- आणि शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच आहे, परंतु शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

मणिपूरमध्ये मरणारे हिंदू नाहीत का? सामनातून केंद्र सरकारवर टीकेचा बाण

sanjay raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयानंतर मणिपूर मध्ये मोठा हिंसाचार घडत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा हिंसाचार सुरूच असून काल तर संतप्त आंदोलकांनी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घरावरच पेट्रोल बॉम्ब टाकून संपूर्ण घर पेटवून दिले. या सर्व घटनांवर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. … Read more

पवारानंतर संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी; गोळ्या घालून स्मशानात पोचवू

sanjay raut (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सुनील राऊत याना कॉल करून ही धमकी दिली आहे. संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला सांगा, अन्यथा दोन्ही भावांना गोळ्या घालून स्मशानात पाठवू अशी धमकी फोन … Read more

संजय राऊतांची अजितदादांवर जहरी टीका; म्हणाले, धरणात मुतण्यापेक्षा….

Ajit pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात पुन्हा एकदा झुंपल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. संजय राऊत शिरसाट त्यांच्यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना थुंकले, त्यानंतर प्रत्येकाने तारतम्य पाळलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी संजय राऊत यांना दिला. मात्र धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं कधीही चांगलं असं … Read more

पंकजाताई, रडगाण्याला कोणी विचारत नाही, धाडसी निर्णय घ्या; राऊतांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझं आहे असं म्हणत माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी खळबळ उडवून दिली होती. पंकजा यांच्या या विधानाने त्या भाजप मध्ये नाराज असल्याच्या चर्चाना पुन्हा एकदा ऊत आला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंकजा मुंडे यांना खास सल्ला दिला … Read more

शिंदे गट म्हणजे कोंबड्यांचा खुराडा, त्या कधीही कापल्या जातील

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर तोफ डागली आहे. मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, तुम्ही जे शिंदे – मिंधे गट … Read more

50 खोकेवाले आमदार हैराण; शिंदेंकडे 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत

eknath shinde with his mla (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी केली असून २००० रुपयांची भेट चलनातून बाद करण्यात आली आहे. बँकेत २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाचे आमदार हैराण झाले असून ते शिंदे … Read more

राज्यपालांचे निकाल बेकायदेशीर, तर मग सरकार कायदेशीर कसे? राऊतांचा रोखठोक सवाल

sanjay raut shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांचे वर्तन बेजबाबदार व घटनेला धरून नव्हते. बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची गरज नव्हती. राज्यपाल चुकले आहेत.” हे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांच्या राजकीय लुडबुडीवर कठोर ताशेरे आहेत. जेथे राज्यपालांनीच निकाल दिला, तेथे त्यांनी शपथ दिलेले सरकार कायदेशीर कसे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील रोखठोक सदरातून त्यांनी सर्वोच्य … Read more

संजय राऊत म्हणजे चुकीची चिट्टी काढून भविष्य सांगणारा पोपट- शंभूराज देसाई

sanjay raut shambhuraj desai

सातारा । पहिल्या काळात जसे पोपटाच्या चिठ्ठी वरून भविष्य बघायचे. त्यातील संजय राऊत म्हणजे चुकीची चिट्टी काढून भविष्य सांगणारा पोपट आहे, अशा शब्दात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. सातारा येथे माध्यमांशी शंभूराज देसाई बोलत होते. संजय राऊत कायम म्हणतात, ३ महिन्यांनी असं होणार, १५ … Read more

बजरंगबलीने मोदी- शहांच्याच टाळक्यात गदा हाणली; सामनातून हल्लाबोल

modi shah raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चाळीसा सारखे कार्यक्रम करायला लावले, परंतु या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी- शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर … Read more