खाजगी शाळांची मुजोरी; पोद्दार इंटरनॅशनल कडून लाॅकडाऊनमध्ये शांळा बंद असूनही 100% फी वसूली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सक्तीच्या फी वसुलीच्या विरोधात कराडच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर पालकांचे निषेध आंदोलन चालू आहे. खरं तर लॉकडाउन मध्ये स्कूल बंद असूनही या पोद्दार इंटरनॅशनल स्कुल कडून सक्तीची 100 % फी ची मागणी करण्यात आली आहे. त्याविरोधात पालकांनी हे आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात दीडशे ते दोनशे पालक उपस्थित आहेत. 50% … Read more

सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

हे तर चव्हाण- उंडाळकर मनोमिलनाला जनतेने दिलेलं प्रत्युत्तर – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघातील 52 पैकी निम्म्या आणि बलाढय ग्रामपंचायतीमध्ये भाजपाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देत निर्विवाद वर्चस्व मिळवले असून असून कराड दक्षिण मतदार संघातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल म्हणजे विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांनी निवडुन येण्यासाठी केलेली अनैतिक युती व चव्हाण उंडाळकर मनोमिलनाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे … Read more

‘या’ तालुक्यात शिवसेना राष्ट्रवादीवर भारी; शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकिंचा निकाल आज जाहीर होत आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीही आमने सामने असल्याचे पहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातही शिवसेना राष्ट्रवादीवर भारी पडल्याचं पहायला मिळालं. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते; निवडणुक अधिकारी पेचात

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार लढत होत असल्याचे चित्र आहे. काही दिग्गज नेत्यांनाही आपल्या गावात हार पत्करावी लागत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावात अजब निकाल लागल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाली आहेत. सातारा … Read more

आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का ; कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हाती येत असून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. कोरेगाव तालुक्यातील मंगळापूर,किन्हई पेठ, कटापूर,ल्हासुर्णे आणि देऊर या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. गतवर्षी शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. आणि … Read more

ग्रामपंचायत निवडणूक | काले गावात पुन्हा एकदा भीमराव दादांचा करिष्मा ; तब्बल 14-3 ने ग्रामपंचायत ताब्यात

कराड | कराड तालुक्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या काले या गावात पुन्हा एकदा जेष्ठ नेते भीमराव दादा पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. भीमराव दादा पाटील गटाच्या व्यंकनाथ ग्रामविकास पॅनल ने तब्बल 14 – 3 असा दणदणीत विजय मिळवून काल्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. काले गावात विरोधकांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. … Read more

कराड तालुक्यातील पहिला निकाल जाहीर ; ‘या’ गावात अतुल भोसले पॅनेलचा दमदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान कराडमध्ये भाजपनं खातं उघडलं असून पहिला निकाल अतुल भोसले पॅनलचा लागला आहे. कराड तालुक्यातील खुबी गावात भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल विजयी झाले … Read more

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; कारही उलटली

कराड :- मद्यधुंद चालकाचा ताबा सुटून कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सुपने, ता. कराड गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर कार महामार्गाकडेला नाल्यात जाऊन पलटी झाली. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर दुचाकीचाही चक्काचूर झाला आहे. कारचा चालक मद्यधुंद … Read more

अकलूजमध्ये लडाख, हिमालयातून नवीन पाहुण्याचे आगमण; कंपन पक्षाचे सयाजीराजे पार्कमध्ये स्थलांतर

सातारा प्रतिनिधी | हिमालयाच्या पर्वतरांगेत व लेह – लडाखमध्ये मूळ वास्तव्याला असलेला थिरथिरा अर्थात कंपनपक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येथील सयाजीराजे पार्कमध्ये येऊन दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली. कंपनपक्ष्याबद्दल डॉ. कुंभार यांनी सांगितलेली माहिती अशी की, कस्तूरिका कुलातील‌ या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर … Read more