Wednesday, June 7, 2023

हे तर चव्हाण- उंडाळकर मनोमिलनाला जनतेने दिलेलं प्रत्युत्तर – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघातील 52 पैकी निम्म्या आणि बलाढय ग्रामपंचायतीमध्ये भाजपाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देत निर्विवाद वर्चस्व मिळवले असून असून कराड दक्षिण मतदार संघातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल म्हणजे विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांनी निवडुन येण्यासाठी केलेली अनैतिक युती व चव्हाण उंडाळकर मनोमिलनाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे कार्यकारणी सदस्य डॉ अतुल भोसले यांनी दिली.

अतुल भोसले म्हणाले की खऱ्या अर्थाने आज जनतेचे आभार मानतो की त्यांनी चांगल्या लोकांना निवडून दिले. तरुण पिढीच्या युवकांना काम करण्याची संधी मतदारांनी दिली आणि निश्चितपणे ही नव्या दमाची लोक चांगलं काम करून आपल्या गावाचं नाव पुढे करतील.

यावेळी त्यांनी उंडाळकर- पृथ्वीराज चव्हाण मनोमिलनावर देखील टीकास्त्र सोडलं. जनतेचा हा कौल म्हणजे गत विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांनी निवडुन येण्यासाठी केलेली अनैतिक युती व चव्हाण उंडाळकर मनोमिलनाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे अशी प्रतिक्रिया अतुल भोसले यांनी दिली.

दरम्यान, कराड दक्षिण मतदारसंघातील कार्वे, शेरे, शेणोली, काले यासारख्या महत्त्वाच्या गावात भाजपने बाजी मारून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जोरदार चुरस पाहायला मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’