मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाने बाजारपेठ, सहकारी संस्थाचा बंद

सकलेन मुलाणी । कराड कराड:- माजी सहकारमंत्री, सप्तपदी आमदारकी पाहिलेले व बाजार समिती, खरेदी- विक्री संघसह सर्व तालुक्यातील संस्थावर वर्चस्व गाजविणारे कराड दक्षिणचे राजकीय पितामह विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाने तालुक्यातील बाजारपेठ, सहकारी संस्थांनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. माजी सहकारमंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांचे सातारा येथे पहाटे पाच वाजता निधन झाल्याची बातमी समजताच कराड तालुक्यातील … Read more

माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

vilaskaka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व … Read more

“मी एटीएम मधून पैसे काढून देतो” अस म्हणत घातला 20 हजारांना गंडा ; पहा कोठे घडली ही घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी तुम्हाला पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला खूप गडबड आहे असे म्हणून एकाने एटीएम कार्डचा पिनकोड माहिती करून घेऊन हातचलाखीने एटीएममधील 20 हजार रूपये काढून एकाची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत शंकर माने (वय 35, रा. गोळेश्‍वर, ता. कराड) यांनी शहर … Read more

कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री ना.शंभूराज देसाई ; गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केली मदत

सकलेन मुलाणी । सातारा सातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात झाला, त्याच वेळी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.अपघात पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय भिलेली होती, तिच्या समवेत … Read more

काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामानासारखा ; अनिल बोंडेंची जोरदार टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामाना सारखा आहे असा सनसनाटी आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. कराड- मसूर येथे आयोजित केलेल्या भाजपच्या किसान मोर्चाच्या कृषी विधेयक‌ समर्थनार्थ मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा अडगळीत पडलेला पक्ष असून आता पुनरुज्जीवनासाठी धडपडत आहे … Read more

‘कश्मिर कि कली’ झाली महाराष्ट्राची सुनबाई ; मराठमोळे अजित पाटील झाले काश्मीरचे जावई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कश्मिर चे 370 कलम हटवलेचा फायदा मराठी पट्ठयाला झाला असुन महाराष्ट्राचे सोयरिक कश्मिर बरोबर जुळले मराठमोळा अजित पाटील कश्मिरचा जावई झाला. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणार्या कराडच्या अजित पाटील यानी कश्मिरी युवती बरोबर विवाह केला. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील हा युवक भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन Instructor … Read more

ढेबेवाडी बसस्थानक चोरट्यांचे टार्गेट ; उभ्या बसमधून डिझेल चोरीचा प्रयत्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण :- सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, विजेचे सुस्थितीतील दिवे आदी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसलेले पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बसस्थानक चोरट्यानी पुन्हा लक्ष्य केले आहे. पहाटेच्या सुमारास स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठे उत्पन्न देणाऱ्या स्थानकाचे हे दैन्य एसटीच्या वरिष्ठ … Read more

कराड येथील दुचाकी चोरी प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुका व कडेगाव तालुका येथून दुचाकी चोरणार्‍या चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजन मधुकर भोसले (वय 21, रा. विहापूर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील … Read more

कराड भाजी मंडई खून प्रकरणी अजून एकास अटक

karad murder

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी येथील भाजी मंडईत मंगळवारी रात्री झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. आरबाज फिरोज बेपारी वय 22 रा. भाजी मंडई, गुरुवार पेठ, कराड असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या तीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत … Read more

‘कृष्णा’च्या शेतकऱ्यांने घेतले 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन

कराड ।  रेठरे बुद्रुक गतवर्षी आलेला महापूर आणि यंदाचा कोरोना संकट काळ या स्थितीत शेतीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या काळात पीकांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कराड) येथील एका युवा शेतकऱ्याने … Read more