साताऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ; 150हून अधिक कंपन्या सहभागी

jobs satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या … Read more

Satara News : केळघर घाटात JCB 100 फूट दरीत कोसळला; चालक जखमी

Kelghar Ghat jcb accident

सातारा । सातारा- मेढा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात जेसीबी 100 फूट खोलदरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात जेसीबी चालक अक्षय कदम यांनी जेसीबीतून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी ते बेशुद्ध पडले. त्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी त्यांना सातारा येथील रुग्णालयात दाखल केलं. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी दुपारच्या सुमारास … Read more

साताऱ्यात IT पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

uday samant

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल. कामगारांसाठी रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री … Read more

Yamaha R15 दुचाकी रात्रीच्या अंधारात रस्त्याकडेच्या झाडाला धडकली; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

Yamaha R15 accident

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. पाचगणी, महाबळेश्वर भागात वाहनांची संख्या वाढली असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे. आज शहरापासून चार किमी अंतरावर एका वेगवान दुचाकीस्वाराने रस्त्याकडेच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार … Read more

कराड – चिपळूण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

leopard death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटणमध्ये बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं असच सुरु आहे. आज (रविवारी) पहाटे कराड – चिपळूण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत अधिकची माहिती अशी कि, … Read more

Satara News : जर्मनीहून आणलेल्या शासनाच्या LED लाईटची दिड महिन्यापूर्वी चोरी, पण साधी तक्रारही नाही; नेमकं चाललंय काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरानजीक असलेल्या मसूरच्या रेल्वेच्या उड्डाणपुलावरील कमानीवर सुशोभीकरणासाठी जर्मनीहून आणलेली अडीच लाख रुपये किमतीची एलईडी लाईट ४ दिवसात गायब झाली आहे. धक्कादायक म्हणजे लाईटची चोरी दिड महिन्यापूर्वी होवूनही याबाबतची कोणतीही तक्रार अद्यापही पोलिसात दाखल झाली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य … Read more

पुणे बेंगलोर महामार्गावर Swift कारचा टायर फुटला अन्…युवा उद्योजक ठार

कराड | पुणे-बेंगलोर महामार्गावर आटके टप्पा येथे स्वीफ्ट गाडीचा पुढचा टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये पोतले (ता. कराड) येथील युवा उद्योजक जागीच ठार झाला. अपघातात ठार झालेल्या युवकाचे शरद चंद्रकांत पाटील (वय-33) असे नाव आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोतले … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून दलित घटकांच्या विकासासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर

Shriniwas Patil

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी १ कोटी ६३ लक्ष रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंदिस्त गटर बांधणे, अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे अशी कामे मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या … Read more

Satara News : पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेवटची उडी मारून येतो म्हणला, अन् पुढे…

omkar lohar drowing

पाटण | मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. ओंकार धर्मेंद्र लोहार (वय- 17 ) असे सदर मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो तारळी नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने ओंकारचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. … Read more

Satara Crime : कराड प्रांत कार्यालयात लाच घेताना दोघे रंगेहात सापडले

karad tehsildar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे.येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70 वर्षे, नोकरी –  लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा प्र फीस कराड) या … Read more