साताऱ्यातील कास धरण लवकरच होणार जनतेस समर्पित; उदयनराजेंकडून पाहणी

Udayanraje Bhosale Kas Lake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव/धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सध्या काम सुरु असल्यामुळे कास धरणाच्या कामाची आज साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे हे कास धरण लवकरच जनतेस समर्पित होई, असे सांगितले आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी … Read more

सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिनचे उद्घाटन

_ Sanitary Pad Vending Machine Satara District Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन व पॅड नाश करणाऱ्या मशीन बसविण्यात आले आहे. या मशिनचे सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला ज. धोटे यांच्या हस्ते औपचारीकरित्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक वर्षा जोशी, न्यायालय व्यवस्थापक रविंद्र काळे, अधिक्षक धनंजय … Read more

Crime News : 2 खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; 4 वर्षांनंतर कारवाई

Crime News Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील दोन खुनातील आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2 खून केल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून मोकाट असलेल्या सराईत आरोपीला न्यायालयातील पोलिसांनी साताऱ्यात शिताफिने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. रोशन अविनाश उर्फ अँडीसन भोसले (वय 39, रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, ता. माळशीरस, जि. सोलापूर, सध्या रा. … Read more

साताऱ्यात 24 तासांत 6 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकाची प्रकृती चिंताजनक

Satara Corona News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 6 रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे. सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 137 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 6 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला … Read more

कराड बाजार समितीचे मतदार हैदराबाद, गोवा सहलीवर

Karad Market Committee (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) मतदान होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप पक्षातील पुढारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात जिल्ह्यातील कराड तालुक्यातील … Read more

उरुलच्या जुगाईदेवीच्या यात्रेत मलकापूरची बैलगाडी 51 हजाराची मानकरी

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामणी भागात ग्रामदेवतांच्या यात्रा सुरु आहेत. या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत, कुस्तीसह अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मलकापुरच्या मायरा युवराज पाटील यांच्या बैलगाडीने 51 हजार 111 पहिले बक्षीस पटकावले. जुगाई … Read more

Crime News : सोनोग्राफी करायला गेला अन् 3 तोळे गमावून बसला

Crime News sonography

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चोरट्यांकडून सोनोग्राफी सेंटरवर अनेकप्रकारच्या तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला जात आहे. असाच प्रकार म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून रुग्णालयातील चोरीच्या घटनेने … Read more

मेढा बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ; शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी

medha bajar samiti election result

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झाले असून महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. याठिकाणी शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मेढा कृषी उत्पन्न बाजार … Read more

कुणाचा बाजार उठणार? मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज

Medha Market Committee elections

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीसाठी सुरुवात झालेली आहे. काल याठिकाणी मतदान पार पडले होते. मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 18 जागा होत्या. यामधील 6 जागा बिनविरोध झाल्या तर उरलेल्या 12 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात उभे राहिले होते. आज या बाजार … Read more

Crime News : मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक

Satara Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मटका किंग समीर कच्छी याच्या जिल्ह्याबाहेर पसरलेल्या मटक्याच्या जाळ्यावर स्थानिक पोलिसांकडून आता कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पंकज अशोकराव परळीकर (वय 30, … Read more