जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वच प्रशासकीय अधिकारी दबावाखाली : साताऱ्यात राष्ट्रवादीचा लाठी मोर्चा

NCP stick marcha

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यात निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असून सत्ताधाऱ्यांचा सांगण्यावरुन खोट्या कारवाया केल्या जात आहेत. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यापासून सर्वच प्रशासकीय अधिकारी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. अधिकाऱ्यांना खोट्या कारवाई करण्याबाबत सत्ताधारी सरकार सूचना करत असून याबाबत अधिकाऱ्यांच्या भेटी घेवुन सुद्धा यामध्ये बदल झाला नाही. यामुळं हा आज लाठी मोर्चा काढण्यात आला … Read more

सात फूटी मगर असलेल्या नदीत एकजण बुडाला : शोधमोहीम सुरू

Koyana River Patan

पाटण | मंद्रुळहवेली येथील कोयना नदीत एकजण बुडाला आहे. गेल्या तीन दिवसापासून शोधमोहिम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मंद्रुळहवेलीच्या यात्रेदिवशीच हा प्रकार झाल्याने नदिकाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काशिनाथ केशव मोरे (वय-53, रा. ठोमसे, ता. पाटण) असे बुडलेल्या संशयिताचे नाव आहे. या नदीत काही दिवसापूर्वी सात फूटी मगर दिसली होती. घटनास्थळावरुन मल्हारपेठ … Read more

राज्यात केवळ ‘या’ बसस्थानकातील प्रवाशांचे तिकीट दर वाढले…कारण काय?

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात केवळ कराड बसस्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट दर वाढीचा फटका बसू लागला आहे. कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे महामार्गावर उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असून तेथे नवा सहापदरी उड्डाणपूल उभा राहणार आहे. यासाठी आता एसटी बसला जादा अंतर फिरून यावे लागत असल्याने 5 ते 10 रूपये तिकिट दर वाढ करण्यात आले. … Read more

पहिले ऑलम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यावर लवकरच चित्रपट : नागराज मंजुळेची घोषणा

Wrestler Khashaba Jadhav Film

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी देशाला कुस्तीत वैयक्तिक खेळात पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे कराडचे सुपुत्र जागतिक दर्जाचे पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनणार आहे. पहिले ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव हे आजही पद्मश्री पुरस्कारपासून अद्याप वंचित आहेत. ऑलम्पिकपेक्षा दुसरे मोठं काय असू शकतं. खाशाबा यांनी जगात भारत देशासह महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे … Read more

फलटण- सातारा रोडवर स्वाभिमानीचा चक्का जाम

Swabhimani

फलटण प्रतिनिधी अनमोल जगताप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाला फलटण शहरातही प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण- सातारा रोडवर वाठार निंबाळकर, चिंचपाटी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आला. कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवावी, … Read more

तोतया पोलिस अधिकाऱ्यांने केली वाहनांची तपासणी

traffic

वडूज | पोलिस अधिकारी असल्याचे सांगून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासणी करणाऱ्या एकास वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार बापू शिंदे यांनी खबरी जबाब दिला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडूज- कऱ्हाड रस्त्यावर हॉटेल ब्ल्यू डायमंडसमोर पाच वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील एक … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 5 वर्षे सक्तमजुरी

Karad Court

कराड | अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी आरोपीस 5 वर्षे सक्तमजूरी व 6 हजार रूपयाची दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी शिक्षा सुनावल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांनी दिली. याबाबतची माहिती अशी, कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने 1 एप्रिल 2016 … Read more

कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले

Koyana Dam Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून आज सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाचा तडाका वाढल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. धरण व्यवस्थापनाने दिलेली माहिती अशी, सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये 1 हजार 50 … Read more

शिवदौलत नोकरी मेळाव्यात 273 उमेदवारांना थेट निवडपत्र

Shiv Daulat Job Fair Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनाही नोकरीचा संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर येथे शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते. पाटण … Read more

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूचे सेवन करू नये : निवासी उपजिल्हाधिकारी

Satara Collector Office

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके तंबाखूचे दुष्परिणाम आणि वाढते कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा आहे. सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये शासन धोरणानुसार तंबाखू सेवनावरील व विक्री विषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे धोरण आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूचे सेवन केले जाणार नाही, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी केले. साताऱ्यात तंबाखू विरोधी … Read more