BREKING NEWS : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अज्ञाताने शेणीच्या गोवऱ्या पेटवून टाकल्याने खळबळ उडाली आहे. पोवई नाका येथील कोयना या निवासस्थानी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार घडला. पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर अज्ञाताने हा प्रकार केल्याचे समजत आहे. साताऱ्यातील घरासमोर शेणीच्या गोवऱ्या पेटवण्याचे … Read more

वडूज पोलिसांची 21 वाहनांवर कारवाई, 31 हजारांचा दंड वसूल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केल्यावर वडूज पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी सुमारे 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून 21 वाहनांवर विविध गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. वडूज पोलिस ठाणे हद्दीत उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग डॉ. नीलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मालोजीरावराव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडूज … Read more

सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 292 पाॅझिटीव्ह तर 2 हजार 32 जणांना घरी सोडले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 292 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 32 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 256 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

पाटण तालुक्यात 75 ऑक्सीजन बेड वाढविणार ः ना. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये एकूण 136 ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत. यामध्ये वाढ करुन दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये  50 याप्रमाणे 75 ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार आहेत. पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये. याकरीता कोरोना उपचार केंद्रामध्ये अतिरिक्त … Read more

वांग नदीवरील बंधाऱ्यात पोहायला गेलेला दहा वर्षांचा मुलागा बुडाला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मराठवाडी जवळच्या वांग नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यास गेलेला येथील दहा वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. समीर राहुल वाघमारे पाण्यात बुडलेल्या मुलाचे नाव असून आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र मुलाचा शोध लागलेला नव्हता. याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, येथील नवीन गावठाणात राहण्यास असलेला … Read more

स्वताः च्या मुलाचा विष पाजून वडिलांने केला खून ः न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Court

सातारा | कौटुंबीक कारणांवरुन पित्याने स्वताः च्या ८ वर्षीय मुलास विषारी औषध पाजुन त्यांचा खून केला होता. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचे सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश आर.डी.सावंत सातारा यांचे कोर्टात होवुन आरोपी पित्यास जन्मठेप व रु २००० / – दंड दंड न दिलेस २ महीने साधी … Read more

महाबळेश्वर पालिकेची कचऱ्यांच्या वर्गीकरणांसाठी क्यूआर कोड प्रणाली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘महामारीच्या काळात कचरा वर्गीकरणाचे महत्व’ याविषयी जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यासोबतच, निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण, कचऱ्याचे ०४ भागात (ओला, सुका, घातक व बायोमेडिकल कचरा) वर्गीकरण, कचऱ्याचा संपूर्ण प्रवास, कचऱ्याचे आरोग्यावर होणारे परिणाम … Read more

मलकापूर शहरात पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई , जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील मलकापूर येथे मलकापूर नगरपंचायत व पोलिसांच्या समन्वयाने कारवाईची मोहिम राबविण्यात आली होती. कराड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात 4 ते 10 मे या दरम्यान कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत किराणामाल, बेकरी, चिकन, … Read more

मुंबई हुन कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅन्कर लीक; पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गॅस गळती

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोल्हापूरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकरमधून सातारा शहराजवळील वाडी फाटा येथे गँस गळती झाली. गँसगळतीमुळे वाहन चालकांच्यात घबराटीचे वातावरण होते. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यामुळे गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/464536811508165 पुणे- बँगलोर महामार्गावर गँस गळती झाली.गँस गळतीमुळे सातारा शहराजवळील वाढे फाटा परिसरात खळबळ उडाली. यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी … Read more

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय घेण्यात आले

Uddhav Thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. १) सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. pic.twitter.com/X8RyEN5B6B — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 5, 2021 २) महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा … Read more