शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Deepak Kesarkar Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे-ठाकरे गट एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्यात नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं … Read more

अंगात ताप, हाताला पट्टी अन कातर आवाज असलेल्या पॉवरफुल पवारांची मंथन शिबिरास हजेरी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणातील एका पॉवरफुल नेते म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख. ते सध्या आजारी असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुसरीकडे शिर्डीत पार पडत असलेल्या पक्षाच्या मंथन शिबीरास पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. … Read more

ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी होय; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ या शिबिरास सुरुवात झाली. यावेळी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “पक्ष बदलणे चूक नाही. आपला पक्ष बदलून वेगळे होऊन मुख्यमंत्री होणे गैर नाही, पण ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे ही बेईमानी आहे,” अशी … Read more

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, अजितदादा करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातो. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबद्दल भाकीत केल्यानंतर अजून एक नेत्याने नवा दावा केला आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असून विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री … Read more

शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचे मोठे विधान

Jayant Patil

शिर्डी: हॅलो महाराष्ट्र – राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थिर नसून लवकरच कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. परंतु, आता राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. एका नेत्याने तर येणारी कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असल्याचा दावा केला आहे तर दुसऱ्या नेत्याने … Read more

ठरलं तर!! रामदास आठवले ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती दिली आहे. रामदास आठवले अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी शिर्डीतून लढायचे आहे पण पडायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत 2009 ला शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. अहमदनगर येथे … Read more

‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…

Kedar Dighe Movie Dharmaveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाईही केली. या चित्रपटाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी मत व्यक्त केल्यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी चित्रपटाबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट … Read more

शिवसेनेतील एका मुस्लीम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र

Shivsena

शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून (shiv sena) बंड केले. त्यानंतर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या साथीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. शिवसेना (shiv sena) फुटल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पक्ष फुटला, नेते विभागले तसं शिवसैनिकही दुभंगले गेले. तसेच … Read more

71 वर्षीय श्रावणबाळाने 105 वर्षांच्या आईला खांद्यावर घेऊन पायी केला शिर्डी प्रवास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतून अनेक लोक शिर्डीला पायी प्रवास करत असतात. अनेक मंडळे शिर्डीसाठी पायी पदयात्रा काढत असतात. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या जन्मदात्या आईला खांद्यावर घेऊन पायी प्रवास करताना दिसत आहे. अनवाणी पायाने आईला डोक्यावरुन घेऊन चालणाऱ्या या श्रावणबाळाचे वय तब्बल 71 वर्ष आहे. या … Read more

श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार

शिर्डी | शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच नॅशनल ॲवार्ड (skoch award)’ ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालक पदावरून त्यांनी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीण कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. नवी दिल्ली स्थित स्कॉच फाऊंडेशन यांच्या वतीने 2003 … Read more