देवस्थान समितींच्या जमीन हस्तांतरणाबाबत महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेऊ- मुख्यमंत्री ठाकरे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी । सतेज औंधकर राज्यात असणा-या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरित्या व्हावे, यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रत्नागिरी जिल्हाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झाली. यावेळी उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री … Read more

सिंधुदुर्गातील कुडोपी येथील पुरातन कातळ शिल्पांच होणार संवर्धन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी । जिल्ह्यातील कुडोपी येथे आढळून आलेली कातळशिल्पे सुमारे १० एकर जागेत विस्तारलेली आहेत. या सर्वांचे अस्तित्व सुमारे इ. स. १० हजार वर्षापूर्वीपासून असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. या कातळ शिल्पांचे संरक्षण करणे प्राथमिक गरज आहे. त्यामुळे ही शिल्पे संरक्षित करण्यासाठी पहिले पाऊल उचलले जाणार आहे. या करिता राज्य पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली … Read more

वेंगुर्ला मातोंड-पेंडूर येथील श्री देवघोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात पार

वेंगुर्ला मातोंड- पेंडूर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात पार पडला. ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.या निमित्ताने सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे,नवस बोलणे आदी कार्यक्रम पार पाडले जातात.

नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

राज्यातील विविध भागांतील हद्दपार झालेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.