सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहोचला 196 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि परिसरात शुक्रवारी नव्याने 14 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये आठ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 196 झाली आहे. एका दिवसात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील 56 वर्षीय महिलेला 25 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल … Read more

सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 153 वर, दिवसभरात 8 नवीन रुग्ण…

सोलापूर प्रतिनिधी । आज दिवसभरात सोलापुरात कोरोनाचे आठ नवीन रुग्ण सापडले आहेत. सोलापुरातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या आज 153 झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना मुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या दहा झाली असून त्यामध्ये पाच पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यामध्ये सोलापुरातील एकता नगर परिसरातील सत्तावन्न वर्षे … Read more

आषाढी पालखी सोहळा परंपरे नुसार निघणार ; राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेची भूमिका

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि संस्कृती सोहळा समजल्या जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळयावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरेला धरून शासनाच्या सहकार्याने यावर्षीचा आषाढी पालखी सोहळा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी मांडली. आषाढी पालखी … Read more

सोलापूरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला आता रोबोट; रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा तुटवडा

सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत शहरातील 19 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन शिफ्टमध्ये या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असून त्यासाठी अवघे नऊ डॉक्टर त्याठिकाणी आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अद्यापही डॉक्टर उपलब्ध झालेले … Read more

सोलापूरमध्ये सर्वधर्मीय महिलांनी एकत्र येत साजरी केली शिवजयंती;15 हजार महिलांचा समावेश

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमध्ये शिवाजी चौकात शिवजयंतीनिमित्त भव्य अशी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. याठिकाणी सर्वधर्मीय महिलांनी शिवजयंती उत्सहात साजरी केली. या उत्सवात 15 हजार पेक्षा अधिक महिलांचा समावेश होता. रात्री 12 वाजता तब्बल 15 हजार महिलांनी शिवजनामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवून शिवजयंतीला सुरुवात केली. यामध्ये हिंदू-मुस्लिम असा कुठलाच भेदभाव न ठेवता सर्व … Read more

या गावाची गोष्टीचं न्यारी! गावानं साजरा केला भटक्या कुत्र्याचा धडाक्यात वाढदिवस

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरतील बार्शी येथील शेंद्री गावात चक्क एका भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी गावात लग्न असल्यासारखी तयारी करण्यात आली. लालूशेठ असं त्या ‘बर्थ-डे डॉग’चं नावं. लोलूशेठ हा कुणाच्या घरचा पाळीव कुत्रा नाही, तर गावात भटकणारा कुत्रा आहे. लालूशेठ हे लोकांनी त्याला दिलेलं नाव. लालूशेठच्या वाढदिवशी फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावकऱ्यांसाठी … Read more

साडे तीन वर्षाच्या ‘विराज’ची चित्तथरारक तलवारबाजी; चिमुरड्याचे कर्तब पाहून नेटकरी थक्क

सोलापूर प्रतिनिधी । सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लहान मुलांनी मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मोबाइलमधल्या गेममध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्याचे बालपण हरवत असून ती एकाच ठिकाणी गुतुंन पडली आहेत. अशी ओरड पालक नेहमी करतात. दुसरीकडे शहरात असा एक साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. जो तलवारबाजी, दांडपट्टा व लाठीकाठी या सारख्या मैदानी खेळांतून लोकांचे लक्ष वेधतोय. सण, समारंभ आणि … Read more

सत्तेची खुर्ची गेली, आता बसायची पण टिकेना..? जेव्हा भर पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादांची खुर्ची मोडते..!!

सोलापूर प्रतिनिधी । राजकारणी आणि खुर्चीचं नातं अतूट आहे. मात्र, खुर्चीनेच दगा दिला तर.. हो असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ओढवला. राज्यातील सत्तासंघर्षात खुर्ची गमावलेले चंद्रकांत दादा पाटील आज सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांचे प्रश्न आणि दादांची तडाखेबंद उत्तर यामुळं ऐन भरात आलेल्या पत्रकार परिषेदमध्ये अचानक गोंधळ … Read more

लोकमंगलने शेतकऱ्याच्या नावावर काढले परस्पर कर्ज?;सुभाष देशमुखांच्या कुटुंबियांची होणार चौकशी

सोलापूर प्रतिनिधी । माजी सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांशी निगडित असलेल्या लोकमंगल उद्योग समूहाचे आणखी एक प्रकरण आज समोर आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेत असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने इंडियन ओव्हरसीज बँकेतून शेतकऱ्याच्या नावावर 2 लाख 98 हजार रुपयांचे पीक कर्ज परस्पर घेतले असल्याचा आरोप मंद्रूप येथील शेतकरी गुलाब नाबिलाल … Read more

दुर्दैवी! व्यायाम करताना ह्रदय विकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू; पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण

पोलिस अधिकारी व्हायचे या एकाच ध्येयाने व्यायाम आणि अभ्यास करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील अमोल पांडुरंग शिंदे या २२ वर्षाच्या तरुणांला व्यायाम करत असतानाच ह्दय विकाराचा तीव्र झटका आल्यानं त्याचा जागेवरती दुर्दैवी मृत्यु झाला. ऐन तारुण्यात काळाने घाला घातल्याने अमोलचे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले.