साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत … Read more

आईच्या कुशीतून गायब झालेलं बाळ मृत अवस्थेत सापडलं; 25 दिवसांच्या बाळाच्या खूनाने खळबळ

सोलापुर | मुरारजी पेठेतील मंगळवेढा चाळीतील अवघ्या 25 दिवसांच्या पुरुष जातीच्या बाळाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परवा रात्रीच्या सुमारास आईच्या कुशीतून गायब झालेल्या बाळाची शोधाशोध सुरु असताना बाळाचा मृतदेह घराबाहेर असणाऱ्या पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आला. दरम्यान,काल पहाटे हा सर्व प्रकार उघडकीस आला. प्रतीक्षा आणि संकेत या दाम्पत्याला 25 दिवसांपूर्वीच एका … Read more

पंढरपुरात ST च्या 125 फेऱ्या रद्द; कार्तिकी एकादशीला येणार्‍या भाविकांना फटका

सोलापूर | एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विविध विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला असून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ही मोठा फटका बसला आहे. एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूर आगारातून दरोज होणाऱ्या एकशे पंचवीस फेऱ्या बंद आहेत. दिवसभरात पंढरपूर आगाराला सुमारे दहा लाख रुपयांचा … Read more

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने दर्शन‌रांगेची व्यवस्था पूर्ण; तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूरात यात्रा

Pandharpur

सोलापूर : तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या१५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. कार्तिकी यात्रेच्याला सुमारे चार लाख‌ भाविक‌ येण्याची शक्यता आहे. येणार्या वारकर्यांसाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. गोपाळपूर रोड लगत दर्शन रांगेसाठी दहा पत्राशेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेतूनच यंदाचा मानाच्या … Read more

दुष्काळी पट्ट्यातील ‘या’ गावात फुलशेतीतून शेतकरी कमावतात चांगला नफा

सोलापूर | जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी गुलाबाचे फुललेले मळे पाहण्यास मिळतात. दररोज ताजे उत्पन्न देणाऱ्या या गुलाबावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ गुलाब घेणारे वडजी हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दहिटणेपासून आत 10 किलोमीटरवर वडजी हे अडीच हजार लोकसंख्येचं … Read more

जेव्हा विद्यार्थी लिहितात ‘बाप्पाला’ पत्र

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाना पत्र लिहून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या या पत्रांचे दररोज परिपाठाच्या वेळी वाचन करण्यात येते. जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे त्याला लढायला बळ दे, जनावरांना चारा दे, कोल्हापूर,सातारा, सांगलीतील पूरग्रस्तांना … Read more

BREAKING NEWS : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून 14 दिवसांचा कडक लॉकडाउन

सोलापूर | पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहा पेक्षा अधिक कोरोना रुग्ण संख्या असलेल्या तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून चौदा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यासंदर्भात येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी आज संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या … Read more

संचारबंदीच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन, उद्या धरणे आंदोलन

पंढरपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने येत्या 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशी व्यापारी महासंघाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात … Read more

…अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचाही पाण्यात बु़डून मृत्यू

River Death

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील एका दर्गा परिसरातील तलावात तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेजण एकाच गावातील रहिवासी असल्यानं गावात शोककळा पसरली आहे. मृत तिघेजण आपल्या नातेवाईकांसोबत बोरामणी येथील दावल मलिक दर्गा या ठिकाणी गेले होते. या दरम्यान दर्गा परिसरातील एका तलावात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तिघांचा … Read more

तब्बल 1 कोटींचे दान : पतीची शेवटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून देणगी

Vithal rukhmini

पंढरपूर | दक्षिण काशी, गोरगरिबांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला पंढरीचा विठूरायाच्या चरणी एका महिला भक्ताने तब्बल 1 कोटी रुपये दान केले आहेत. मुंबईतील या भक्त असणाऱ्या महिलेच्या पतीचे काही दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले असून पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दान दिले आहे. विठ्ठलभक्त पतीच्या निधनानंतर पत्नीने 1 कोटीची देणगी देत इच्छा पूर्ण केली. कोरोनाच्या … Read more