पोलिसकाकाने स्वतःच्या खिशातून भरला जवानाच्या वाहनाचा दंड !

सोलापूर । अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना अनेक कारणांवरून दंड केला जातो. मात्र, पोलिसांनी कधी स्वतः एखाद्याचा दंड भरला आहे असे ऐकण्यातही किंवा पाहण्यातही आले नसेल. मात्र, असा प्रकार तुळजापूर या ठिकाणी घडला आहे. तुळजापूर मंदिर परिसरातील वाहतूक पोलिस वाहतूकीचे नियमन करत असताना त्यांनी एका जवानाच्या वाहनाला दंड ठोठावला. हा प्रकार त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या … Read more

ट्रॅफिक कॅमेऱ्यांपासून वाचणे कठीण आहे ! जर ई-इनव्हॉईसबाबत शंका असेल तर काय करावे हे जाणून

नवी दिल्ली । दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या मेट्रो शहरात ट्रॅफिक सिग्नलवर संशयास्पद लोकं आणि रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस कॅमेरे वापरतात. हे ट्रॅफिक कॅमेरे जास्त वेगाने जाणारी वाहने आणि नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने यांचे ऑनलाईन चलन पाठविण्यात मदत करतात. तसं पहिला तर या कॅमेऱ्यांमध्ये काहीही गडबड नसते, परंतु काहीवेळा तांत्रिक बिघाडामुळे चुकीचे चलन देखील कापले जाते, म्हणून … Read more

वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडाल तर आपला वाहन परवाना रद्द होऊ शकतो; जाणुन घ्या

मुंबई | परिवहन आणि मोटारवाहतुक नियम सतत बदलत असतात. सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभाग वेगवेगळ्या पर्यायांना अवलंबवते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया आणि दंड घेतले जातात. काही महत्त्वाचे नियमाचे पालन केले नाही तर मोठा दंड होऊ शकतो पर्यायी तुमचा वाहतूक परवानाही जप्त केला जाऊ शकतो. मोठ्या आवाजात संगीत वाजवत असाल तर तुम्हाला 100 रुपयांचा दंड होऊ शकतो. … Read more

नुसता शो नको, आय वॉन्ट ऍक्शन – गृहराज्यमंत्र्यांकडून वाहतूक पोलिसांची कानउघडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवजड वाहन चालकांच्या मनमानी कारभारामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापले आहेत. नुसता शो नको तर आय वॉन्ट ऍक्शन , कडक कारवाई करा अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कडक कारवाई करा असेही ते म्हणाले. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची गय करू नका त्यांच्यावर कडक कारवाई करा असा आदेश त्यांनी … Read more

थरारक व्हिडिओ! कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवर नेले फरफटत

नागपूर । कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांच्यावर गाडी घालत कारच्या बॉनेटवर बसवून दुचाकींना धडक मारत समोर जाणारा आरोपी आकाश चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी देशमुख या दोघांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सक्करदरा चौक ते राजे रघुजी मार्गावर हे थरारनाट्य … Read more

वाहन चालवताना सतर्क रहा, अन्यथा ‘या’ एका चुकीमुळे रद्द होऊ आपले License

हॅलो महाराष्ट्र । मोटार वाहन नियमात नवीन बदल केल्याने प्रवाशांना आणि पोलिस कर्मचार्‍यांसाठी सारखेच बदल करण्यात आलेले आहेत. कागदपत्रे डिजिटल बनवण्याबरोबरच, कोणी जर ट्रॅफिक पोलिसांशी गैरवर्तन केल्यास त्याचे चालन फाडण्याबरोबरच लायसन्स देखील रद्द केले जाऊ शकते. याशिवाय गाडी न थांबविणे, ट्रकच्या लोडिंग क्षेत्रात गाडी चालवण्याबद्दलही लायसन्स रद्द केले जाऊ शकते. डिजिटायझेशनला चालना देण्यावर भर प्रवाशांच्या … Read more

‘शंभर दे चावी घे’ लाचखोर पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल

नाशिक प्रतिनिधी |  नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोव-यात सापडत आहेत, त्यातच भर म्हणून शिंदे टोल नाक्यावर दुचाकी चालकाकडुन शंभर रुपयांची नोट स्विकारतांनाचा पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. शिंदे येथील टोलनाक्यावर कार्यरत असणा-या पोलीसांनी दुचाकी चालकाची चावी काढुन घेऊन दोनशे रुपयांची मागणी केली, परंतु दुचाकी चालकाने … Read more

औरंगाबादेत वाहतूक पोलिसांची दादागिरी कॅमेरात कैद

औरंगाबादेत प्रतिनिधी | वाहतूक पोलिसांची दादागिरी कॅमेरात कैद झाली आहे. दंडाची रक्कम नसल्याने तरुणाने ऑनलाइन घरपोच पावती मागितल्याने संतापलेल्या वाहतूक पोलिसांनी मारहाण करीत दुचाकी जप्त केली. या घटनेमुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे अात्सुक्याचे ठरणार आहे. औरंगाबाद शहरात भर रस्त्यावर वाहनाचा बाजार मांडला आहे. निम्म्याहून अधिक रस्ता वाहनांनी व्यापल्याने रस्त्यांना वाहनतळाच … Read more

हेल्मेट ऐवजी तो चक्क कढई घालून चालवतो गाडी

Helmet Cumpulsion in Pune

पुणे प्रतिनिधी | ‘पुणं तिथं काय उणं’ या उक्तीला साजेशी अशी घटना आज पुणेकरांना अनुभवायला मिळाली. नववर्षाच्या सुरवातीपासून म्हणजेच १ जानेवारी पासून पुण्यात वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली अाहे. नागरिकांच्या सुरक्षेकरता हेल्मेट न वापरणार्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अशात पुण्यातील एका वकीलाने हेल्मेट एवजी चक्क कढई डोक्यावर घालून दुचाकी चालवलणे पसंद केल्याचे … Read more