वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडाल तर आपला वाहन परवाना रद्द होऊ शकतो; जाणुन घ्या

मुंबई | परिवहन आणि मोटारवाहतुक नियम सतत बदलत असतात. सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभाग वेगवेगळ्या पर्यायांना अवलंबवते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया आणि दंड घेतले जातात. काही महत्त्वाचे नियमाचे पालन केले नाही तर मोठा दंड होऊ शकतो पर्यायी तुमचा वाहतूक परवानाही जप्त केला जाऊ शकतो.

मोठ्या आवाजात संगीत वाजवत असाल तर तुम्हाला 100 रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याचसोबत इतरांसाठी तो आवाज धोकादायक आहे असे वाटत असेल तर वाहतूक पोलिस तो दंड वाढवूही शकतात. शाळा आणि सरकारी रुग्णालयाच्या जवळ ताशी 25 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल तर दंड होऊ शकतो. तिसरा नियम म्हणजे गाडी चालवताना फोनवर बोलत असाल तर दंड आणि परवाना जप्त होऊ शकतो.

यासोबतच काही अजून महत्त्वाचे निर्णयांची यादी सोबत देत आहोत. झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवल्यावर दंड आकारला जाऊ शकतो तसेच काही महिण्याकरिता तुमचा वाहतूक परवाना रद्द केला जाऊ शकतो. प्रेशर हॉर्णला सुद्धा बंदी आहे. या हॉर्न वाजवण्याचा मोठा दंड आहे. गर्दीमध्ये रुग्णवाहिकाना रस्ता नं दिल्यामुळे मोठा दंड होऊ शकतो आणि परवाना जप्त होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like