मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???
लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंबईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.