…तेव्हा आंदोलन पुकारणारे संभाजी भिडे आता कुठे आहेत ?? संजय राऊतांचा सवाल

sanjay raut and bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. ज्या संभाजी भिडेंनी जेव्हा माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा आंदोलनाची हाक दिली होती ते आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले … Read more

एक राजा बिनडोक ; नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर घणाघात

Udayanraje and prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला … Read more

सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेच्या आधारे आरक्षण द्या ; उदयनराजेंची मागणी

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केले आहे. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्ते नुसार आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना … Read more

माझ्या डोळ्यांतून पाणी आलं; उदयनराजेंनी लावला योगी आदित्यनाथांना फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी आग्र्यातील निर्माणाधिन मुघल संग्रहालायचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय ठेवण्याची घोषणा केली आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं होत. याबाबत आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. यावेळी … Read more

….तर मी खासदारकीचा राजीनामा देणार ; उदयनराजेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने दिलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असा इशारा उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिला आहे. उदयनराजे म्हणाले,”माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही.मी काही राजकारणी नाही. राजकारण … Read more

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा नाही तर परिणामांना सामोरे जा! उदयनराजे बरसले

सातारा । मराठी समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशाराच उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. … Read more

‘त्या’ मुलीच्या निधनानं उदयनराजे हळहळले; लिहिली भावूक पोस्ट

सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून एका खास व्यक्तीच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. तिचं जाणं हे फक्त सातारकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत वाईट बातमी आहे अशा शब्दांत त्यांनी या पोस्टची सुरुवात केली. “प्लमोनरी हायपरटेन्शन” या आजाराचं निदान झाल्यानंतर त्याच्या झुंज देणाऱ्या कोमल पवार गोडसे हिचा संघर्ष त्यांनी आपल्या या … Read more

१० ते २ वाजण्याच्या दरम्यान काळात कोरोना होत नाही का? खासदार उदयनराजेंचा सवाल

सातारा । भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. कोरोना महामारीवर सामूहिक प्रयत्नांद्वारे करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह व अन्य तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर निदर्शनास आलेल्या काही गोष्टी उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढं मांडल्या. ‘लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्याचा पर्याय नव्हे. तसं असेल … Read more

“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का?” – उदयनराजे भोसले

नवी दिल्ली । राज्यसभा खासदारांनी काल संसदेत शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील इतर सात जणांनी शपथ घेतली. भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली.त्यावरून “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता.” असं भाष्य … Read more

उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर वैंकय्या नायडूंची प्रतिक्रिया, म्हणाले..

नवी दिल्ली । राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटले. या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजप आणि व्यंकय्या नायडूंवर जोरदार टीका केली. या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ”मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना … Read more