यंदा उदयनराजे साजरा करणार नाहीत आपला वाढदिवस.. पण का?

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाही आहेत. यासंबंधी उदयनराजे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे. अखिल विश्वाचे पोट भरणा-या बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती या आणि अशा अनेक … Read more

उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय?- खासदार संजय काकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदाना नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही,” असं म्हणत राज्यसभेचे … Read more

”मोदींना पेढेवाले म्हणणाऱ्यांबरोबर भाजपा असल्याचा आनंद”; शिवसेनेचा सामनातून भाजपला टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी विचारणा करत वादाला आमंत्रण दिलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने मैदानात उडी घेत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांचे वक्तव्य हा शिवरायांचा अपमान आहे असं म्हणत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं भाजपच्या टीकेला आज समानाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं. शिवसेनेनं उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुन अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे.

छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे-उदयनराजे भोसले

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकाचा वाद मिटण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेले दिसत आहेत.

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

“शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष एकदाच जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

उदयनराजेंनी केलं तेलंगणा पोलिस दलाचे या शब्दांत अभिनंदन

मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून त्या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा क्रूरतेचा कळस जेंव्हा उघडकीस आला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तातडीने आरोपींना अटक केली होती. मात्र आता  या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या घटना मतदानादिवशी उघडकीस आल्या आहेत. कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला राग सातारा जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्यावर काढला आहे. तुम्ही मोदी-शहांचं कंत्राट घेऊन काम करता का? अशा शब्दांत नागरिकांनी मोनिका सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. साताऱ्यातील नवलेवाडी येथे ‘ईव्हीएम’मध्ये घोळ झाल्याने नागरिक संतप्त झाले होते.

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाणांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब..!! २ दिवसांत कळणार अधिकृत निर्णय

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.