Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

पोलिस अधिकार्‍याची राहत्य‍ा घरी गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट लिहून पत्नी, वडिलांची मागितली माफी

अमरावती | जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आपल्या पोलीस निवासस्थानी गळफास लावून आत्महत्याची खळबळ जनक घटना आज दुपारी २ वाजता उघडकिस आली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवून आपल्या पत्नी व वडिलांची माफी मागितली आहे. धारणीचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी हे २५ जानेवारीपासून रजेवर … Read more

राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

अमरावती मधील कहाणी : कोरोनाच्या काळात शेवटी मृत्यूचं जिंकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ची दिसून येते आहे. अनेक जिल्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक स्थानिक सामाजिक कारकर्ते सुद्धा कोरोनाच्या संकटकाळी लोकांची मदत करत आहेत. पण कोरोना मात्र काही संपत नाहीत लोक अक्षरश कंटाळून गेले आहेत. अमरावती मध्ये राहत असलेल्या आईच्या बाबतीत अशीच घटना घडली तिच्यावर शेवटी … Read more

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

धक्कादायक! गरोदर पत्नीवर गोळी झाडून सैनिकाने स्वतः केली आत्महत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आर्मीच्या जवानाने आपल्या गरोदर पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री वर्ध्यातील पुलगाव येथे ही  घटना घडली आहे. बुधवारी रात्री आपल्या ड्युटीवरून परत आल्यानंतर अजय कुमार सिंग यांचे पत्नी प्रियांका कुमारी यांच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस गन मधून प्रियांका यांच्यावर गोळी … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more

वाढत्या गर्मीनं विदर्भ बेजार; अकोल्यात 47.4 अंश तापमानाची नोंद

अकोला । एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोकं हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 47.4 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान सहन … Read more

विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून … Read more