अमरावतीच्या मोझरीत होणार पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई देशात व राज्यात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणू कोविड आजाराच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा, यासाठी अमरावती शहरापासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुकडोजी महाराजांच्या मोझरी मधील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका सुसज्ज रुग्णालयात आता सुमारे 350 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय कायमस्वरुपी निर्माण करण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट गेल्यावर … Read more

शरद पवार २ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

अतिवृष्टीतने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विदर्भाला सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच अनुषंगाने विदर्भातील ओल्या दुष्काळानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी आज विदर्भातील काटोल भागातील  कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

विदर्भात भाजपची पीछेहाट!!

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपला २५ च्या आसपास जागांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत.भाजप-शिवसेना युतीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथून निवडून येतात त्या विदर्भात भाजपला हा मोठा धक्का आहे.

पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील बीबी येथे २५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित

लोणार तालुक्यातील बिबी येथील मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात २५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाल आहे. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरण कंपनीन तातडीन उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील महिला वर्गांनी दिला आहे.

काँग्रेसकडून अकोला जिल्ह्यात ‘या’ दोघा नवोदितांना मिळाली संधी

अकोला प्रतिनिधी। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा अकोला पूर्व या मतदार संघातून नव्याने काँग्रेसमध्ये सामील झालेले विवेक पारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोट विधानसभा जागेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री रामदास बोडखे यांचे पुत्र संजय बोडखे यांना उमेदवारी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण पाच मतदार संघ असून आणखी तीन मतदार संघाची घोषणा आघाडी कडून … Read more

भाजपच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ‘या’ ३ नावांचा समावेश

अमरावती प्रतिनिधी। भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. सोबतच बहुप्रतिक्षीत असलेल्या यादीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारांची देखील नावे जाहीर झाली आहेत. या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ३ नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे … Read more

निवडणुकीतील गैरव्यवहारांची नागरिक देणार माहिती

अमरावती प्रतिनिधी। अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी माहिती देण्याच आवाहन प्रधान प्राप्तीकर संचालक कार्यालयाचे उपसंचालक अभय नन्नावरे यांनी केले आहे. लोकशाहीच्या हा उत्सव लोकशाही मार्गाने पार पडावा म्हणून नागरिकांचा ही यांत सहभाग असावा या दृष्टीने हा निर्णय घेणार आल्याचे समजते आहे. काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण … Read more

रास्ता गेला खड्ड्यात !!! २५ वर्षांपासून बुलडाण्यातील गिरणी गावाची खड्डे कहाणी..

बुलढाणा प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खड्डे पुराण सुरु आहे. एक वेळ शहरातील रस्त्यांची प्रशासन कशी-बशी बोळवण तरी करते मात्र ग्रामीण भागाला सावत्र वागणूक मिळते. अशीच वागणूक गेल्या २५ वर्षांपासून एका गावाला मिळत आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गिरणी हे एक गाव. पण गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी गावाने चकचकीत रस्ता पाहिला नाही … Read more

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more