नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली.

आघाडीतील बिघाडी टळली, राष्ट्रवादी युवक अध्यक्षाने घेतली प्रणिती शिंदेंविरुद्ध माघार

दरम्यान जुबेर बागवान यांच्या माघार घेण्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यात ‘युती’ पाठोपाठ ‘आघाडी’ला देखील बंडखोरीची लागण

परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपा ‘युती’ला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. युतीच्या बंडखोरांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आता याच बंडखोरीची लागण ‘आघाडी’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला देखील लागलेली दिसत आहे. परभणी विधानसभेसाठी रविराज देशमुख यांचे नाव घोषित झाल्यानंतर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सुरेश नागरे यांनी आता बंडाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून परभणी … Read more

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा शड्डू; जिजाऊची ‘ही’ लेक लढणार कोथरुडमधून

मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारलं जाणं हा महिला वर्गाचा अपमान समजून संभाजी ब्रिगेडने सोनाली ससाणे यांना चंद्रकांत पाटील यांच्यसरोधात उमेदवारी दिली आहे.

कराड उत्तरमध्ये महायुतीला बंडाचं ग्रहण; माघार कोण घेणार – मनोज घोरपडे की धैर्यशील कदम ?

कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला जनाधार नसून येथील खरी लढत मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील अशीच होईल असा अंदाज नागरिकांनीही व्यक्त केला आहे.

अशोक चव्हाण यांनी तावडेंच्या सल्ल्याचा काढला वचपा; तिकीट कापण्यावर केले मिश्किल ट्विट

नांदेड प्रतिनिधी। राजकारणात कोणाचे दिवस कसे फिरतील काही सांगत येत नाही. भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापले जाणे हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्यातच तावडेंनी नांदेड दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच बहुमत देणार आहे तेव्हा अशोक चव्हाण यांनी झाकली मूठ सवा लाखाची, यानुसार निवडणूक … Read more

उदयसिंह पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीत वाढ

सातारा प्रतिनिधी। कराड दक्षिण मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचे चित्र आता समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. उदयसिंह यांनी आज कोणतेही शक्ती प्रर्दशन न करता यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करुन पाटील यांनी अर्ज आज उमेदवारी अर्ज … Read more

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केलीत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा विक्रमी दिवस म्हणावा लागेल. अनेक महत्वाच्या नेत्यांनी आपआपली नामनिर्देशनपत्रे आज दाखल केलीत. उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे. तपशील पुढीलप्रमाणे … Read more

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे