खडसेंचे समर्थक असल्यामुळे भाजप आमदाराला तिकीट नाकारलं..!!

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक जस जश्या जवळ येत आहेत तसे नेत्यांचे राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरदार सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपाकडून उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झाल्या आहेत. जाहीर झालेल्या यादीत आपले नाव नसल्यामुळे बहुतेकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे शहादा विधानसभेचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी या गोष्टीला अपवाद राहिले नाही … Read more

‘रोड नाही, तर वोट नाही’; पिंपळगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

यवतमाळ प्रतिनिधी। निवडणूका जवळ आल्या की, राजकीय नेते मतांसाठी अनेक आश्वासने देतात. निवडणूका संपल्या की, दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे हा काही नेत्यांचा आणि प्रशासनाचा स्वाभाविक गुण असतो. याच गुणांचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील पिंपळगावच्या ग्रामस्थांना आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपळगाव ते सराई हा रास्ता खड्ड्यात शोधायची वेळ आली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थामध्ये तीव्र … Read more

‘सोलापूर मध्य’साठी शिवसेनेकडून ‘काँग्रेसच्या निष्ठावंताला’ उमेदवारी

सोलापूर प्रतिनिधी। अखेर ‘सोलापूर शहर मध्य’चा शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रश्न निकाली लागला आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.  निवडणुकीच्या तोंडावर ‘सोलापूर शहर उत्तर’चे माजी काँग्रेस आमदार दिलीप माने यांना शिवसेनेकडून ‘सोलापूर शहर मध्य’साठी उमेदवारी जाहीर झाली आहे. दिलीप माने यांना शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ‘एबी फॉर्म’ही दिला आहे. आता काँग्रेसच्या … Read more

पारनेरमध्ये आजी-माजी शिवसैनिक आमनेसामने; विजय औटी विरुद्ध निलेश लंके सामना रंगणार 

पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेती मालाला हमीभाव, आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचं लंके म्हणाले.

कराड दक्षिण मधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांची उमेदवारी जाहीर

कराड प्रतिनधी | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदार संघातून काँग्रेस कडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या लोकसभा लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसची ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर#hellomaharashtra@INCMumbai @INCIndia @prithvrj pic.twitter.com/akCa9HraS0 — Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 1, 2019 काँग्रेस पक्षाने ५१ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली होती … Read more

गडचिरोलीची जनता म्हणतेय – आम्हाला पाहिजे दारूमुक्त उमेदवार..!!

गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.

काँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय

बुलडाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे एक वेगळेच असल्याचे कारण समोर येत आहे. ईव्हीएमने घेतल्या जाणाऱ्या मतदानावर संशय असल्याचे कारण पुढे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे … Read more

भाजपचा जखमी वाघ नव्याने लढण्यासाठी सज्ज ; एकनाथ खडसे आज भरणार आपला उमेदवारी अर्ज

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपलं आराध्य दैवत असलेल्या मुक्ताई मातेचं आज त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं.

राज्यात आतापर्यंत १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे – जळगाव- दोन मतदारसंघात 2 उमेदवार, बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

मुंबई, वृत्तसंस्था । विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आय.ए.एस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ … Read more