मी पण इंदिरा गांधींची नात आहे! कारवाई करता करा!प्रियंका गांधींचे योगींना खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ‘तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, पण सत्य समोर आणत राहील. लक्षात ठेवा मी इंदिरा गांधींची नातं आहे अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सुनावलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी वारंवार करत आहेत. यानंतर काही भाजपा नेत्यांकडून गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्याला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर योगी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

प्रियंका आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या,’जनतेची सेवक या नात्याने माझी लोकांशी बांधिलकी आहे. जाणते पुढे सत्य समोर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. मी सरकारची स्तुती करायला बसलेले नाही. सरकारच्या विविध विभागातून मला धमकी मिळत आहे, पण यामध्ये सरकारने वेळ वाया घालवू नये. मी सत्य बोलतच राहीन. मी इंदिरा गांधींची नातं आहे इतर विरोधी पक्षांप्रमाणे भाजपाची अघोषित प्रवक्ता नाहीये.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी आणण्यासाठी प्रियांका गांधी यांनी बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली होती. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल असंही गांधी यांनी म्हटलं होतं. मात्र या बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियांका गांधी यांच्यात बराच काळ संघर्ष चालला होता. त्यामुळे प्रियांका गांधींनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेवर भाजपा नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment