ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आजकाल ऑनलाइन सामान खरेदी करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे यातून उद्भवणाऱ्या संकटांचाही सामना करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार ठाणे शहरातील नौपाडा या ठिकाणी घडला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
घटनेच्या दिवशी तीन आरोपींनी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तब्बल 13 लाखांची लूट करून फरार झाले आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वसई-विरार आणि भिवंडीतील 67 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर शेवटी ठाणे शहर पोलिसांनी या तिन्ही बनावटी स्विगी बॉयना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अटक केली आहे. या आरोपींमध्ये जय भगत, अभिषेक सत्यवान आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.
या आरोपींनी आधी सामान डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने नौपाडा परिसरातील एका सोसायटीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एका फ्लॅटमध्ये जाऊन चाकूच्या धारावर लूट केली. या लुटीदरम्यान आरोपींनी 5 लाखांची कॅश, 5 लाखांचे सोन्याचे दागिने आणि अन्य किमतीचं सामान चोरले आणि घटनास्थळावरून फरार झाले. या आरोपींना पकडण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी वसई-विरार आणि भिवंडीतील 67 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर त्यांनी आरोपी चोरट्यांना अटक केली.