अफगाणिस्तानच्या राजदूताच्या मुलीचे अपहरण केल्याबद्दल संतप्त तालिबान म्हणाले,” पाकने आरोपींविरोधात त्वरित कारवाई करावी”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या राजदूताच्या मुलीच्या अपहरणानंतर तालिबान संतप्त झाला आहे. तालिबान्यांनी याचा निषेध करत म्हटले आहे की, या कृत्यास जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयात आणले पाहिजे. दोहामधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ट्वीट केले: “आम्ही पाकिस्तानात एका अफगाण मुलीवर झालेल्या अपहरण आणि हिंसाचाराचा निषेध करतो.”

सुहेल शाहीन म्हणाले, “अशा प्रकारचे कृत्य केल्याने या दोन्ही देशांमध्ये द्वेष निर्माण होऊ नये म्हणून पाकिस्तान सरकारला दोषींना अटक करण्यासाठी आणि शिक्षा देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याची आमची विनंती आहे.”

अफगाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 16 जुलै रोजी इस्लामाबाद येथे घरी जात असताना राजदूतच्या मुलीचे अपहरण केले गेले आणि काही तासांच्या छळानंतर तिला सोडण्यात आले. या घटनेनंतर अफगाणिस्तानने शनिवारी काबुलमधील पाकिस्तानी राजदूताकडे निषेध नोंदवून जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा करावी आणि अफगाण राजनायकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे पाकिस्तानला आव्हान केले. यानंतर रविवारी अफगाणिस्तानने आपले राजदूत आणि पाकिस्तानमधील ज्येष्ठ राजनायक यांना परत बोलावले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group