तालिबान नेत्याने घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट, ड्रॅगनला म्हंटले ‘विश्वासू मित्र’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । अफगाणिस्तानावर हल्ला करणार्‍या तालिबान्यांनी आता चीनला आपला विश्वासू मित्र असल्याचे म्हंटले आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादरच्या नेतृत्वात तालिबानी शिष्टमंडळाने बुधवारी अचानक चीनला भेट दिली आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालिबान्यांनी बीजिंगला विश्वासू मित्र असल्याचे म्हंटले आहे आणि आश्वासन दिले की, हा गट “कोणालाही अफगाणिस्तानाचा प्रदेश वापरण्यास परवानगी देणार नाही”.

अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान आणि चीनमधील ही पहिलीच बैठक आहे. तालिबान्यांनी सरकारी सैन्याने व्यापलेला बहुतांश भूभाग ताब्यात घेतला असून चीनला चिंता निर्माण झाली की, पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ETIM) हा त्याच्या अस्थिर झिनझियांग प्रांतातील उईघूर अतिरेकी गट आहे आणि तो अफगाण सीमेवरुन घुसखोरी करू शकेल.

चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत पुष्टी केली की,”बरादरच्या नेतृत्वातील एक प्रतिनिधीमंडळ बीजिंगजवळील तियानजिन बंदरात वांगला भेटले. मंत्रालयाने वांग यांच्या बरादर आणि त्यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या भेटीची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली.

या बैठकीच्या काही दिवस अगोदरच 25 जुलै रोजी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी चेंगदू शहरात वांग यांची भेट घेतली आणि अफगाणिस्तानात दहशतवादी सैन्य काढून टाकण्यासाठी पाकिस्तान आणि चीन “संयुक्त कारवाई” करण्याची योजना सुरू करण्याचे दोन्ही देशांनी जाहीर केले.

बातमी नुसार, बरादरने या सलोख्याच्या प्रक्रियेत चीनच्या निःपक्षपाती आणि सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी यावेळी ETIM चा उल्लेखही केला. अफगाणिस्तान आपल्या शेजार्‍यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करू इच्छित आहे. अफगाण तालिबान्यांना भविष्यातील विकासासाठी अधिक भागीदार आणि गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला आणि यासंदर्भात संबंधित प्रयत्न करायला आवडेल. तालिबान महिला आणि मुलांचे हक्क देखील सुनिश्चित करेल.

यूएनच्या ताज्या अहवालात म्हटले गेले आहे की,”चीनच्या अस्थिर झिनजियांग प्रांताला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या बदाखशान प्रांतात शेकडो ETIM लढाऊ सैनिक जमले आहेत. वांग म्हणाले की,”ETIM ही एक लिस्टेड दहशतवादी संघटना आहे जी प्रादेशिक अखंडतेसाठी धोका दर्शविते.”

तालिबान आपल्यात आणि ETIM पासून अंतर राखू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामुळे दहशतवाद निर्मूलनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. “चीन हा एक विश्वासू मित्र आहे,” असे बरदार म्हणाला. त्याने पुढे सांगितले कि, “अफगाण तालिबान गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण तयार करेल आणि या संदर्भात संबंधित प्रयत्न करेल. अफगाणिस्तानात सलोख्यापर्यंत पोहोचण्याचे गांभीर्य आहे आणि सर्व पक्षांना मान्य असेल अशी चौकट तयार करायची आहे. तालिबान महिला व मुलांचे हक्क सुनिश्चित करेल. ”

त्यांनी बरादर यांना सांगितले की,” अमेरिकन आणि इतर नाटो सैन्याच्या तत्काळ जाण्याने अफगाण लोकांना त्यांच्याच देशाच्या शाश्वत विकासासाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे.” अफगाणिस्तानाला महत्त्वाचे लष्करी सामर्थ्य असल्याचे वर्णन करताना वांग म्हणाले की,”अफगाणिस्तानच्या शांतता आणि सलोखा प्रक्रियेत चीन रचनात्मक भूमिका बजावण्यास तयार आहे.”

Leave a Comment