तालिबान्यांनी भारताला सांगितले,”कोणीही आपला शेजारी बदलू शकत नाही, परंतु आपण एकत्रितपणे शांततेत जगू शकतो”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । तालिबानकडून भारतासाठी एक सकारात्मक स्टेटमेंट समोर आले आहे. वस्तुतः अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यांची माघार घेण्याची अंतिम मुदत तसेच तालिबानच्या समर्थनातील परिस्थिती यांच्यात काबूलविषयीच्या भारताच्या धोरणाबद्दल संशयाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात तालिबानने म्हटले आहे की, त्यांचा शेजारील देश भारत आणि प्रदेशातील इतर देशां सोबत शांततेत जगण्यावर विश्वास आहे. कोणताही देश आपला शेजारी बदलू शकत नाही असेही तालिबान्यांनी यावेळी म्हटले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी भारत आणि काश्मीरबद्दल विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात या गोष्टी सांगितल्या. सुहेल शाहीन म्हणाले की,”पाकिस्तान हा आपला शेजारी देश आहे. दोन्ही देशांचे इतिहास आणि मूल्ये सारखे आहेत. भारत हा देखील आपला प्रादेशिक देश आहे. कोणताही देश आपला शेजारी किंवा त्याचा प्रदेश बदलू शकत नाही. आपण हे वास्तव नक्कीच स्वीकारले पाहिजे आणि शांततेत सहजीवन जगले पाहिजे. हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.”

अफगाणिस्तानाचा प्रदेश परदेशी कब्जापासून मुक्त करुन तेथे इस्लामिक सरकार स्थापन करणे हे आपले लक्ष्य असल्याचे ‘सुहैल’ ने तालिबानचे ‘राष्ट्रवादी इस्लामिक शक्ती’ असे म्हणून वर्णन केले. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबानच्या काही गटाशी संपर्क स्थापित केला आहे. यात मुल्ला बरदार यांचादेखील समावेश आहे. यापूर्वी अफगाण शांतता प्रक्रियेमधून भारताला वगळण्यात आले होते.

शांतता प्रस्थापित करण्यात पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावली आणि पुढच्या टप्प्यात तालिबान आणि अफगाण सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी एकत्र आले. गेल्या दोन दशकांत भारताने अफगाणिस्तानाला 3 अब्ज डॉलर्सची विकास मदत दिली आहे. यामुळे अफगाणिस्तानात भारताचा प्रभाव खूप वाढला आहे. यामुळे पाकिस्तानवर प्रचंड संताप आहे. तथापि, आता भारताची भविष्यातील भूमिका अनिश्चिततेने घेरलेली आहे. तेही जर तालिबान अफगाणिस्तानात एक सामर्थ्यशाली शक्ती म्हणून उदयास आले तर.

नव्या वास्तवाच्या दरम्यान तालिबानशी झालेल्या भारताच्या संपर्कांची पुष्टी देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,” भारत अफगाणिस्तानाच्या सर्व बाजूंच्या संपर्कात आहे. दुसरीकडे शाहीन म्हणाले की,” या अहवालांविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याने आपण यावर काही भाष्य करणार नाही.” ते पुढे म्हणाले कि, ‘भारताने असे म्हटले आहे की, तालिबान हिंसा भडकावत आहे, हे भूमिकेच्या वास्तविकतेपेक्षा अगदी वेगळं आहे. अफगाणिस्तानाच्या प्रश्नावर त्यांची विश्वासार्हता कमी करते.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment