पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |खासदार श्रीरंग बारणे यांनी आर्दश सांसद ग्राम योजनेत दत्तक घेतलेले खोपटे गावाचा विकास केला नाही. ते मावळ मतदारसंघाचा विकास काय करणार अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पावर यांनी केली होती. त्यांना श्रीरंग बारणे यांनी उत्तर दिले आहे.
खोपटे गावामध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेजची व्यवस्था केली. मुख्य रस्त्याला पेव्हींग ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे सर्व सोयींनी युक्त असे ग्रामपंचायत कार्यालय देखील उभारण्यात आले आहे. तसेच गावाजवळ असणाऱ्या तळाचे सुशोभिकरण स्मशान भूमीची उभारणी अशी कामे करून गावाचा कायापालट करण्यात आला आहे असे श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
खोपटे गाव १००% हागणदारीमुक्त झाले आहे. त्याच प्रमाणे प्राथमिक शाळेत देखील संगणकांची उपलब्धी करून दिली आहे. त्यामुळे विरोधकांनी आधी विकास बघावा आणि नंतरच बोलावे. कुणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत जावून विकास उघड्या डोळ्याने पहावा असे श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.