चर्चा तर होणारच : नरेंद्र मोदींना मनीऑर्डर, बारामतीच्या चहावाल्याने दाढी करण्यासाठी 100 रूपये पाठविले

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढवलेल्या दाढीमुळे चांगलेच चर्चेत असल्याचे पहायला मिळत आहे. आता चक्क राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधून पंतप्रधानांना एका चहावाल्याने दाढी करण्यासाठी मनीऑर्डर पाठवली आहे. अनिल मोरे असे या चहावाल्याचे नांव असून त्यांने एक पत्र आणि 100 रूपये पाठवलेले आहेत.

विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वाढलेल्या दाढीवरून अनेकदा टिका केलेली आहे. मात्र आता बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढलेली दाढी कापण्यासाठी चक्क 100 रुपयांची मनीऑर्डर केली आहे. शहरातील इंदापूर रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर अनिल मोरे हे आपली चहाची टपरी चालवतात.

अनिल मोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे दाढी वाढवून सर्वत्र फिरत आहेत. त्यांना वाढवायचेचं असेल, तर देशातील रोजगार वाढवावा. कोरानाच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य सुविधेत वाढ करावी, लसीकरणाचा वेग वाढवावा. लोकांच्या समस्या सुटण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भूमीका त्यांनी मांडली आहे. मी माझ्या कमाईतून पंतप्रधान मोदी यांना दाढी करण्यासाठी 100 रुपये पाठवत आहे. पंतप्रधानांचे पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते असून, त्यांच्या विषयी मला आदर आहे. त्यांना त्रास देण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मात्र सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटकाळात देशात आरोग्याच्या सुविधा आणि रोजगार वाढवावा. तसेच कोरानामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याची मागणीही केली आहे. तर पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे अनिल मोरे यांनी म्हटले आहे.