14 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोल्लाच्ची : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या पोल्लाच्चीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक १४ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यातून समोर आलेल्या माहितीने पोलिसदेखील चक्रावले आहेत. या अल्पवयीन मुलीवर सहापेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला आहे.

हि 14 वर्षांची एका 16 वर्षाच्या मुलावर प्रेम करत होती. त्या मुलाने तिचे लैंगिक शोषण केलं. त्यानंतर त्याच्या ५ मित्रांनीदेखील तिचं लैंगिक शोषण केलं. मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असताना कुटुंबियांना याची माहिती समजली. यानंतर कुटुंबीयाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. या पाच आरोपींपैकी दोघेजण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकते. तिचे आई- वडील मजुरी करत असल्यामुळे ती बऱ्याचदा घरी एकटीच असायची. हि मुलगी शेजारीच राहणाऱ्या ११ वीत शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तो मुलगा तिचं शारिरीक शोषण करू लागला.

प्रियकराच्या मित्रांनी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या काकानंदेखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. सोमवारी मुलीच्या पोटात अचानक दुखू लागलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या १६ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. यासोबतच भिंत रंगवण्याचं काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला तसेच एस. नागराज, टी. प्रवीण आणि व्ही. मुथुमुरगन यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. तसेच मुलीच्या काकांचा शोध सुरु आहे.