Monday, January 30, 2023

आधी वादग्रस्त विधान, अन् आता चौफेर टीकेनंतर तानाजी सावंतांचा माफीनामा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. यांनतर तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी माफी मागतो असं त्यांनी म्हंटल.

मी मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. राहिला विषय माफीचा तर, ज्या समाजामुळे मी कॉलर ताठ करून फिरतो त्या समाजाची माफी मला लाज वाटत नाही. माझं वक्तव्य मराठा समजला खटकलं असेल ते एकदा नाही तर एक लाख वेळा माफी मागेन, पाळण्यातील लहान बाळापासून ते ९० वर्षाच्या आजोबापर्यंत मी सर्वांची माफी मागतो असे तानाजी सावंत यांनी म्हंटल. तसेच 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल असेही ते म्हणाले.

नेमक्या कोणत्या विधानावरून वाद??

- Advertisement -

उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावरून भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला.