Tata Altroz CNG : 21000 रुपयांत करा बुकिंग; काय आहेत फीचर्स?

Tata Altroz CNG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतीना वैतागून अनेक ग्राहक CNG गाड्यांना आपली पसंती दाखवत आहेत. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक कार निर्माता कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने सुद्धा आपल्या Tata Altroz ​​CNG चे बुकिंग सुरु केलं असून अवघ्या 21,000 रुपयांत तुम्ही ही हॅचबॅक कार घरी घेऊन जाऊ शकता. या गाडीची डिलिव्हरी मे 2023 पासून सुरू होणार आहे. आज आपण जाणून घेऊया Tata Altroz ​​CNG चे खास फीचर्स आणि तिच्या किंमतीबाबत ….

26 किमी/किलो मायलेज-

Tata Altroz ​​CNG ची खास गोष्ट म्हणजे या कारमध्ये 60 लिटरच्या मोठ्या सिलिंडरऐवजी 30-30 लिटरचे दोन सिलिंडर मिळतील. कोणत्याही कारमध्ये दोन सिलिंडर देण्याची ही पहिलीच वेळ आहे. Altroz ​​CNG मध्ये 1.2-लीटर, 3-सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 77 bhp पॉवर आणि 97 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते तर पेट्रोल मोडमध्ये 86 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क आउटपुट देते. CNG मोडमध्ये ही कार 26 किमी/किलो मायलेज देईल.

Tata Altroz CNG

फीचर्स – Tata Altroz CNG

कारच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास Tata Altroz CNG मध्ये 7.0-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश बटन स्टार्ट, ऑटो स्टार्ट-स्टॉप, व्हॉइस अॅक्टिव्हेटेड सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हाय अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, क्रूझ कंट्रोल यांसारखी अनेक दमदार अशी वैशिष्ट्ये तुम्हाला मिळतील. तसेच या कारमध्ये तुम्हाला थर्मल इन्सिडंट प्रोटेक्‍शन, गॅस लीक डिटेक्‍शन फिचर आणि मायक्रो स्विच अशी सुरक्षा वैशिष्‍ट्ये सुद्धा मिळतात. याशिवाय या कारमध्ये सिंगल अॅडवान्‍स्‍ड ईसीयू हे फीचर्स देण्यात आलं आहे. हे फीचर्स पेट्रोल मोडवरून सीएनजी मोड व सीएनजीवरून पेट्रोल मोडवर बदल करताना एकसंधी व जर्क फ्री ड्राइव्‍ह अनुभवाची खात्री देते.

Tata Altroz CNG

किंमत किती?

कंपनीने Tata Altroz ​​CNG एकूण 4 व्हॅरिएन्ट मध्ये आणली आहे. यामध्ये XE, XM+, XZ आणि XZ+ यांचा समावेश आहे. तुम्हाला टाटाची ही CNG कार ऑपेरा ब्‍ल्‍यू, डाऊनटाऊन रेड, आर्केड ग्रे व अव्‍हेन्‍यू व्‍हाइट या चार रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असेल. Tata Altroz ​​ची सुरुवातीची किंमत 6.45 लाख रुपये आहे. त्याच्या CNG व्हेरिएन्टची किंमत पेट्रोल कारपेक्षा 90 हजार रुपये जास्त असेल. त्यामुळे Altroz ​​CNG ची किंमत जवळपास 7.25 लाख रुपये असू शकते. कंपनीकडून या कारवर 3 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटर पर्यंत वॉरंटी देण्यात आली आहे.

हे पण वाचा :

Mahindra चा ग्राहकांना झटका!! या गाडीची किंमत वाढवली

Steel Wheel की Alloy Wheel, कोणतं चाक Best? पहा फायदे अन् तोटे

Kia Seltos नवीन फीचर्स सह लाँच; 13 कलर अन् बरंच काही.. किंमतही पहा

Maruti Suzuki : लवकरच बाजारत येतेय SWIFT चं नवीन माॅडेल; जबरदस्त फिचर्स अन् कमालीचं इंजिन, किंमत किती?