TATA Sumo : टाटाची सर्वाधिक विक्री झालेली 7 सीटर Sumo येतेय नव्या लूकमध्ये; पहा फिचर्स अन् किंमत

Tata Sumo Car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतातील विश्वसनीय कार उत्पादक टाटा लवकरच आपली जुनी 7 सीटर Sumo कार (TATA Sumo) नवीन फीचर्ससह बाजारात लाँच करणार आहे. हि कार नुकत्याच लाँच झालेल्या महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओ आणि बोलेरोला टक्कर देणार आहे. अवघ्या 5.45 लाख रुपयांपासून सुरू झालेल्या या टाटा सुमोने भारतीय बाजारपेठेत दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. 2936 cc च्या डिझेल इंजिनसह, सुमारे 15 kmpl चा मायलेज देणारे हे वाहन सर्वांच्या पसंतीस उतरले होते. यानंतर काही काळाने या गाडीचे प्रोडक्शन बंद झाले.

नवीन व्हर्जन लॉँच
टाटा मोटर्स (TATA Sumo) आपली जुनी कार बाजारात परत आणणार आहे जे 7 सीटर वाहन असेल. नवीन वाहनाची अपग्रेड केलेली आवृत्ती खूपच स्पर्धात्मक बनवण्यात आली आहे जेणेकरून ते इतर वाहनांच्या तुलनेत ह्याची विक्री मोठ्या प्रमाणात होईल. या कारमध्ये (TATA Sumo) अत्याधुनिक वैशिष्ट्यांसोबतच क्रूझ कंट्रोलही देण्यात आला आहे ज्यामुळे लांब पल्ल्याचा आणि एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना चालकाला कमी त्रास होईल.

या कारची किंमत आणि मायलेज
टाटा मोटर्सची हि कार (TATA Sumo) डिझेलवर चालणार आहे. या कारची किंमत 6.5 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. हि कार सर्वात स्वस्त कार ठरणार आहे. हि कार 2022 हे वर्ष संपायच्या आत कधीपण लाँच होऊ शकते.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…