हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tax Saving Scheme : आता आर्थिक वर्ष संपण्याची वेळ जवळ आली आहे. यादरम्यान बहुतेक कॉर्पोरेट्स कंपन्या आपल्या कर्मचार्यांकडून गुंतवणूकीचे पुरावे घेतले जातात. प्रत्येकजण जास्तीत जास्त कर वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, ज्यामुळेच हे पुरावे खूप महत्वाचे ठरतात. हे जाणून घ्या कि, कर्मचार्यांकडून देण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि त्यानुसारच टॅक्स कापला जातो.
जर आपण नोकरदार असाल आणि अजूनही गुंतवणूक केली नसेल तर असेही काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपल्याला टॅक्स वाचवता येऊ शकेल. तर आज आपण तज्ञांनी सुचवलेल्या 5 टॉप कर बचत योजनांबाबतची माहिती जाणून घेउयात…
सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम (SCSS)
या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. जो नंतर तीन वर्षांपर्यंत वाढवता देखील येतो. सध्या या योजनेवर 8 टक्के व्याज दिले जात आहे. कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला या योजनेमध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करते येते. तसेच कलम 80C अंतर्गत एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट देखील मिळवता येते. मात्र यामढील व्याज हे दर तीन महिन्यांनी दिले जाते. Tax Saving Scheme
PPF आणि सुकन्या समृद्धी योजना
या योजनांमध्ये आधी 7.1 टक्के आणि नंतर 7.6 टक्के रिटर्न मिळतो. तसेच याद्वारे मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. मात्र चांगला रिटर्न मिळवण्यासाठी यामध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. PPF चा किमान कालावधी 15 वर्षे तर सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या वयाच्या 21 वर्षांपर्यंत आहे. हाय इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करणे खूप फायद्याचे ठरू शकेल. Tax Saving Scheme
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS)
वृद्धापकाळातील खात्री करण्यासाठी NPS हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. यामधील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स फ्री आहे. यामध्ये कलम 80CCD (1B) अंतर्गत वार्षिक 1.5 लाख आणि अतिरिक्त 50 हजार रुपये गुंतवता येतील. NPS मध्ये गुंतवणूक केल्याने इन्कम टॅक्समध्ये एकूण 2 लाख रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळू शकेल. Tax Saving Scheme
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि टॅक्स सेव्हिंग FD (TFD)
लो-इनकम टॅक्स स्लॅबमधील गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. या दोन्ही योजनांचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सध्या NSC वर 7 टक्के तर TFD वर सुमारे 7 ते 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. जरी बँक FD आणि NSC वार्षिक रिटर्न देत असले तरी यावर मिळणारे व्याज हे गुंतवणूकदारांसाठी करपात्र आहे.
इक्विटी लिंक्ड टॅक्स सेव्हिंग स्कीम
कर बचत करण्यासाठी इक्विटी लिंक्ड स्कीम खूप लोकप्रिय आहेत. याद्वारे आपले पैसे शेअर्समध्ये गुंतवले जातात. या योजना तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या असतात, मात्र कर बचत पर्यायांमध्ये या सर्वात लहान योजना आहेत. मुंबईस्थित म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर असलेल्या अभय माथुरे यांनी ELSS, म्युच्युअल फंड रिटायरमेंट स्कीम आणि NPS मध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे कारण याद्वारे चांगल्या रिटर्न मिळण्यास वाव आहे. ते म्हणतात की,” ELSS फंड इतरांपेक्षा चांगले आहेत कारण त्यांचा लॉक-इन कालावधी कमी आहे. व्हॅल्यू रिसर्चनुसार, ELSS ने गेल्या तीन वर्षांत सरासरी 14.83 टक्के रिटर्न दिला आहे. Tax Saving Scheme
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html
हे पण वाचा :
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Income Tax वाचवण्यासाठी 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, बचतीबरोबरच मिळेल मोठा फंड
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवा 16.26 लाख रुपये !!!