हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ।
मोदी सरकारने कर स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. करदात्यांना दिलासा देताना अर्थमंत्री म्हणाले की, आता
5 ते 7.5 लाख रुपये उत्पन्न मिळविण्याकरिता 10 टक्के कर भरावा लागेल.
7.5 ते 10 लाख रुपये मिळविण्याकरिता तुम्हाला 15 टक्के कर भरावा लागेल.
10 ते 12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्यासाठी 20 टक्के कर भरावा लागेल.
12.5-15 लाखांपर्यंत उत्पन्न मिळविण्यासाठी 25 टक्के कर भरावा लागेल.
कर वसुलीसाठी कोणालाही त्रास दिला जाणार, टैक्स पेयर चार्टर बनविणार
अर्थमंत्री म्हणाले की, कर वसुलीसाठी कोणालाही त्रास दिला जाणार नाही. आयकर कायद्याअंतर्गत टैक्स पेयर चार्टर आणला जाईल. करदात्याच्या मनातील कराविषयीची भीती कमी केली जाईल. कर वसुलीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाईल. एकूणच सरकार करदात्याला त्रास देण्यापासून वाचवेल. त्याचबरोबर कर न चुकवणार्यांसाठी हा कायदा आणखी कठोर बनविला जाईल.
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 60 लाख नवीन करदात्यांची भर पडली आहे. या कालावधीत 40 कोटींपेक्षा जास्त आयकर विवरणपत्र भरले गेले. मागील अर्थसंकल्पात सरकारने अडीच लाखांपर्यंत करमुक्त ठेवला. त्याचवेळी अडीच लाख ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के कर निश्चित करण्यात आला. याशिवाय 5 लाख ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर जाहीर करण्यात आला.