हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Taxation on Gold : सोन्याचे असे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये प्रत्येकाला गुंतवणूक करता येते. भारतीयांमध्ये तर सोने हे सर्वांत आवडीचे आहे. सध्याच्या काळात फिजिकल गोल्ड व्यतिरिक्त, डिजिटल गोल्ड तसेच पेपर गोल्डची मागणी देखील खूप वाढली आहे. ज्यामुळे, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याआधी त्यासंबंधिच्या कर दायित्वांची माहिती असणे गरजेचे आहे.
फिजिकल गोल्डच्या विक्रीवर लागू होतो कॅपिटल गेन टॅक्स
जेव्हा एखादी व्यक्ती सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, सोन्याची नाणी यांसारख्या फिजिकल स्वरूपात सोन्याची विक्री करते तेव्हा त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. कारण इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार सोने ही भांडवली मालमत्ता मानली जाते. जो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स यांसारख्या नफ्याच्या प्रकारावर अवलंबून असेल. जर विक्री करण्यापूर्वी 36 महिन्यांपेक्षा जास्त काळ सोने ठेवले तर त्यावर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल अन्यथा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स नुसार टॅक्स भरावा लागेल.
डिजिटल गोल्डच्या विक्रीवरील टॅक्स हा फिजिकल गोल्डप्रमाणेच असेल
कोरोना काळात डिजिटल गोल्डची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. डिजिटल गोल्ड सुरक्षितता, सुविधा आणि शुद्धता देते. आपल्याला अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मेटल ट्रेडिंग कंपन्यांकडून (SafeGold किंवा MMTC-PAMP) ई-सोने खरेदी करता येते. मेटल ट्रेडिंग कंपन्या गुंतवणूकदाराच्या वतीने सोने लॉकरमध्ये जमा करतात. तसेच पेटीएम, गुगल पे सारखे Apps ही गुंतवणूकदारांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म देतात. मात्र, इथे हे लक्षात घ्या कि, SEBI किंवा RBI सारख्या कोणत्याही सरकारी संस्थेद्वारे त्याचे रेग्युलेशन केले जात नाही. या डिजिटल गोल्डवरील कर दायित्व (Taxation on Gold) हे फिजिकल गोल्डप्रमाणेच आहे.
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्सच्या विक्रीवरील टॅक्स
सरकारच्या वतीने RBI कडून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स जारी केले जातात. जे आठ वर्षांच्या मुदतीनंतर रिडीम करता येतील. मात्र, खरेदी केल्याच्या पाच वर्षांच्या शेवटी देखील ते रिडीम केले जाऊ शकतात. याशिवाय, गुंतवणुकदाराला सेकंडरी मार्केटमध्येही सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स विकण्याचा पर्याय आहे. स्टॉक एक्स्चेंजवर जारी केलेल्या सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्सची लिस्ट आणि SGBs च्या विक्रीवरील टॅक्स डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत:
आठ वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर रिडीम केलेल्या गोल्ड बॉण्ड्सवर झालेला कोणताही नफा हा टॅक्स फ्री असेल.
पाच वर्षांनंतर SGBs च्या विक्रीवरील कोणताही नफा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानला जाईल आणि इंडेक्सेशननंतर अशा नफ्यावर 20 टक्के टॅक्स (Taxation on Gold) आकारला जाईल.
SGBs च्या सेकंडरी मार्केटमध्ये विक्री करण्यावर कोणताही नफा लॉन्ग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या आधारे टॅक्स आकारला जातो. जो 36 महिन्यांच्या आत विकल्यास व्यक्तीच्या सामान्य टॅक्स स्लॅबवर आधारित टॅक्स लावला जाईल. अन्यथा,लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्सवर 20 टक्के आणि 4 टक्के सेस लावला जाईल.
यामध्ये वार्षिक 2.5 टक्के दराने गुंतवणूकदाराला सहामाही आधारावर व्याज मिळेल. “इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न” या शीर्षकाखाली हे व्याज उत्पन्न समाविष्ट केले जाईल आणि त्यावर त्यानुसारच टॅक्स आकारला जाईल. मात्र, म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) सारख्या इतर पेपर गोल्डच्या गुंतवणुकीवर फिजिकल गोल्डप्रमाणेच टॅक्स (Taxation on Gold) आकारला जाईल.
हे ही वाचा –
Gold Price Today : सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या आजचे दर
Gold : बाजारातील जोखीम पाहून गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळले
Gold Price : सोन्याचा भाव 53,000 रुपयांच्या जवळ; आता खरेदी करावी की विक्री याबाबत तज्ञांचे मत पहा