नवी दिल्ली । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला आहे. TCS व्यतिरिक्त, इतर पाच भारतीय आयटी कंपन्यांनीही जगातील टॉप-25 कंपन्यांमध्ये स्थान मिळवले.
ब्रँड व्हॅल्युएशन कंपनी ब्रँड फायनान्सने एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मौल्यवान आयटी ब्रँडच्या लिस्टमध्ये इन्फोसिस तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय अन्य चार मोठ्या देशांतर्गत आयटी कंपन्यांनीही टॉप-25 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. विप्रो सातव्या, एचसीएल आठव्या, टेक महिंद्रा 15व्या आणि एलटीआय 22व्या स्थानावर आहे.
Accenture या वर्षी देखील सर्वात मजबूत ब्रँड
Accenture हा जगातील सर्वात मौल्यवान आणि मजबूत IT सर्व्हिस ब्रँड आहे. रिपोर्ट नुसार, त्याची ब्रँड व्हॅल्यू $36.2 अब्ज आहे. 2021 मध्ये Accenture हा सर्वात मौल्यवान आणि मजबूत IT सर्व्हिस ब्रँड होता. TCS मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्के आणि 2020 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढला आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू $16.8 अब्ज आहे.
भारतीय IT कंपन्यांनी अमेरिकेला मागे टाकले
2020 ते 2022 दरम्यान भारतातील विविध IT सर्व्हिस ब्रँड्सची सरासरी 51 टक्के वाढ झाली आहे. यादरम्यान, यूएस आयटी कंपन्यांच्या ब्रँडमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली. यामुळेच अमेरिकन कंपनी IBM 2022 च्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू $16.05 बिलियन वरून $10.5 बिलियनवर आली आहे.
इन्फोसिस सर्वात वेगाने वाढणारी कंपनी
यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला, इन्फोसिस जगातील सर्वात वेगाने वाढणारा IT सेवा ब्रँड म्हणून उदयास आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची ब्रँड व्हॅल्यू 52 टक्के आणि 2020 च्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये त्याचे ब्रँड मूल्य $12.8 अब्ज आहे.
ग्राहकांचा TCS वर विश्वास
टीसीएसचे मुख्य विपणन अधिकारी राजश्री आर यांनी सांगितले की, ही क्रमवारी कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे बाजारपेठेतील कंपनीच्या वाढत्या प्रासंगिकतेची आणि ग्राहकांसाठी तिच्या नवकल्पना आणि परिवर्तनाची साक्ष देते.