मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे संमेलन हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये 13 ते 15 मे या कालाधीमध्ये होणार आहे. या शिबिराला राहुल द्रविड (Rahul Dravid) उपस्थित राहणार आहे. भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
या शिबिराला राहुल द्रविडसह (Rahul Dravid) कुस्तीपटू बबिता फोगट देखील या शिबिराला उपस्थित राहणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. या शिबिराला संपूर्ण देशभरातून 139 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
गांगुलीनंतर द्रविड
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकातामधील गांगुलीच्या घरी भोजन केले होते. गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधीसुद्धा या चर्चांना उधाण आले होते. एवढेच नाहीतर त्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास गांगुलीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद देण्यात येणार होते. मात्र सौरव गांगुलीने अद्याप कोणतीही राजकीय इच्छा व्यक्त केली नाही.
हे पण वाचा :
काही लोक पावसाळ्यातील छत्र्यांसारखे कधीतरी उगवतात आणि… ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
PPF खात्यात गुंतवणूक करा अन् करोडपती व्हा; कसे ते जाणून घ्या
अरे अरे.. सेल्फीची हि कुठली पद्धत? अक्षय कुमारचे केस ओढून चाहत्याने केला कहर
‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’च्या ट्रेलर लॉंचसाठी ठाकरे आणि खान एकाच मंचावर
राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका; नवनीत राणांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा